Dhananjay Munde heart attack : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल

Dhananjay Munde heart attack : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता.

Dhananjay Munde heart attack : मंत्री धनंजय मुंडे यांना हृदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल
: धनंजय मुंडे पुन्हा म्हणाले "मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच"Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 11:58 PM

मुंबई : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा झटका (heart attack) आल्याची एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडे यांना किरकोळ त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर तातडीने त्यांना उपरासाठी दाखल करण्यात आले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचले होते. त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल होत धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी केली आहे. धनंजय मुंडे हे सध्या 46 वर्षांचे आहेत. राज्य सरकारमधील एक धडाडीचा मंत्री आणि फर्डा वक्ता अशी धनंजय मुंडे यांची मुख्य ओळख आहे. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांना कडवी झुंज देत यावेळच्या विधानसभेत परळी मतदारसंघातून विजयी झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांमध्ये धनंजय मुंडेंना पाहिलं जातं. या बातमीने राज्यात सध्या सर्वानाच धक्का बसला आहे.

राजेश टोपे काय म्हणाले?

धनंजय मुंडे आणि डॉक्टरांची भेट घेतल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.  डॉ. समधानी धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी एमआरआय केले आहे. सर्व नॉर्मल आहे. माझ्या मते जे काही वायटल पॅरामीटर म्हणतो ते सर्व ठीक आहे आता, असे टोपे म्हणाले आहेत. तसेच  मी त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली, गप्पा मारतील. डॉक्टर समधानी उद्या सांगू शकतील. मात्र ते पूर्ण स्थिर आहेत. काळजी करण्याचे काही कारण नाही.

कशामुळे मुंडेंना हा त्रास झाला?

आम्हा सर्व राजकारणी मंडळींना रात्रंदिवस काम असते. त्यात धावपळ होते. काल ते परभणीवरून आले. आज जनता दरबार होता. या कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते. उद्या डॉक्टरांनी मला उद्या बोलावलं आहे. आमचे शेजारी आहे. आमच्या मराठवाड्याचा भूमिपूत्र आहे. मी त्यांना सांगितलं की नॉर्मल राहा. चिता करू नका, असा मित्रत्वाचा सल्ला मी त्यांना दिला आहे. जरा त्यांनी आराम केला तर सर्व गोष्टी ठीक होतील, अशी प्रतिक्रिया राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपेंची पहिली प्रतिक्रिया

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

सध्या प्रकृती स्थिर

सध्या धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्याकाळच्या वेळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या आवश्यक त्या तपासण्या करून त्यांच्यावर उपचार सुरू केले आहेत. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवले जाणार आहे. राजे टोपे यांनी डॉक्टरांशी, रुग्णालय प्रशासनाशी आणि धनंजय मुंडे यांच्या परिवाराशी चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

काळजी करण्याचे कारण नाही

ब्रीच कँडी हे मुंबईतील चांगल्यातल्या चांगल्या रुग्णालयापैकी एक आहे. तिथे सर्व सोयी सुविधा आणि डॉक्टरांची चांगली फोजही धनंजय मुंडे यांच्या उपचारासाठी असणार आहे. व्हीआयपी लोकांना शक्यतो याच रुग्णालयात नेण्यात येतं. सध्या भितीदायक कुठलीही स्थिती नसल्याने काळजी करण्याचे कारण नाही असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे.  रुग्णालय प्रशासनाकडून मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच रुग्णालय प्रशासनही याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.

Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

Raj Thackeray Thane: राज ठाकरेंची सभा म्हणजे ‘उत्तर’ पूजा, आधी भैय्यांसोबत काटाकुटी आता गुलु गुलु; किशोरी पेडणेकरांनी डिवचले

ST Workers Strike : एसटी कामगारांकडून केलेल्या वसुलीतून पडळकर, खोतांचा हिस्सा किती? अतुल लोंढेंचा सवाल

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.