गंभीर वातावरण, चेहऱ्यावर तणाव, धनंजय मुंडेंच्या जनता दरबारातील EXCLUSIVE व्हिडीओ
बलात्काराच्या आरोपांनंतर अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला दैनंदिन क्रम तसाच ठेवला आहे.
मुंबई : बलात्काराच्या आरोपांनंतर अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला दैनंदिन क्रम तसाच ठेवला आहे. या गंभीर आरोपांनंतरही ते वेगवेगळ्या बैठकांना हजेरी लावत आहेत. आज (14 जानेवारी) त्यांनी जनता दरबारही घेतला आणि विविध नागरिकांचे प्रश्न जाणून घेत त्यावर उपाययोजना केल्या. मात्र, यावेळी ते तणावात दिसत होते. (Dhananjay Munde attend Janata Darbar amid allegations of rape).
धनंजय मुंडे यांनी आज सकाळपासूनच त्यांच्या सरकारी निवासस्थान चित्रकूट येथे सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्याही भेटी घेतल्या. तसेच यानंतर त्यांनी दुपारी जनता दरबार घेतला. जनता दरबारात धनंजय मुंडे यांच्या चेहऱ्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता. ते या तणावातच आपलं कार्यालयीन काम करत होते. त्यामुळे धनंजय मुंडे स्वतः राजीनामा देणार की शरद पवार यावर निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घेणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
दर गुरुवारी ठरल्याप्रमाणे आजही @NCPspeaks कार्यालयात जनता दरबारास उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न , अडचणी समजून घेतले, ते सोडवण्याबाबत संबंधितांना सूचना केल्या, पक्ष कार्यकर्त्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/OEe9bs665s
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 14, 2021
पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर
विरोधी पक्ष भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकूणच ठाकरे सरकारची कोंडी करायला सुरुवात केलीय. त्यापार्श्वभूमीवर शरद पवार यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, “धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील बलात्काराचे आरोप हे गंभीर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला एक पक्ष म्हणून याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. याप्रकरणात कोर्ट आणि पोलीस काय कारवाई करायची ती करतील. पण पक्ष धनंजय मुंडे यांच्याबाबत लवकरच निर्णय घेईल.”
“धनंजय मुंडे हे बुधवारी मला भेटले. मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला सविस्तर माहिती दिली. त्यानुसार धनंजय मुंडे यांचे काही व्यक्तींशी संबंध होते. त्यावरुन मुंडे यांच्याविरोधात काही तक्रारी करण्यात आल्या. हे प्रकरण या दिशेने जाईल, याची कल्पना धनंजय मुंडे यांना होती. त्यामुळेच धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात धाव घेतली होती आणि आदेश प्राप्त करुन घेतला होता. त्यामुळे आता याप्रकरणात फारसे बोलण्यासारखे काहीही नाही,” असे शरद पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :
‘धनंजय मुंडेची हकालपट्टी ते आमदारकी रद्द करा’, भाजप आक्रमक
धनंजय मुंडेंवर माझा विश्वास, ते स्वत:च राजीनामा देतील: चंद्रकांत पाटील
Sharad Pawar | शरद पवारांची 5 मोठी विधाने, धनंजय मुंडेंना थेट इशारा
संबंधित व्हिडीओ पाहा :
Dhananjay Munde attend Janata Darbar amid allegations of rape