Dhananjay Munde case | रेणू शर्मा यांच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी! गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी

रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी नवी मुंबई पोलीस, गृहमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसंच सुरक्षेची मागणीही त्रिपाठी यांनी केलीय.

Dhananjay Munde case | रेणू शर्मा यांच्या वकिलाला जीवे मारण्याची धमकी! गृहमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 2:20 PM

मुंबई: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांच्या वकिलांनीही आता गंभीर आरोप केला आहे. रेणू शर्मा यांचे वकील रमेश त्रिपाठी यांनी स्वत: ही माहिती दिली आहे. रमेश त्रिपाठी यांनी याबाबत नवी मुंबई पोलीस, गृहमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. तसंच सुरक्षेची मागणीही त्रिपाठी यांनी केलीय.(Renu Sharma’s lawyer Ramesh Tripathi alleges death threats)

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. या केसमध्ये रमेश त्रिपाठी हे रेणू शर्मा यांचे वकील आहेत. आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. त्याचबरोबर आपल्याला बदनाम करण्याचा प्रकार सुरु असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे. तसंच पीडित महिलेवर अर्थात रेणू शर्मा यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याबाबत आपण स्वत: लवकरच खुलासा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

तपास अधिकारी मुंडेंच्या जवळचा, वकिलांचा आरोप

क्रारदार महिलेने केलेल्या आरोपांचा तपास करणारा पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार महिलेचे वकील अ‌ॅड. रमेश त्रिपाठी यांनी गुरुवारी केला आहे. तसेच, तक्रारदार महिलेने जर सांगितलं तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दुसरा अधिकारी देण्याची मागणीही करणार असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितलं आहे.

तक्रारदार महिलेचे वकील काय म्हणाले?

तक्रारदार महिला यांनी डीएन पोलीस ठाण्यात आज जबाब नोंदवीला यावेळी तक्रारदार महिलेच्या वकिलांनी महिलेची भूमिका मांडली. यावेळी बोलताना “या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी या धनंजय मुंडे यांच्या जवळच्या आहेत. त्यामुळे या घटनेत तक्रारदार महिलेला न्याय मिळणार नाही. या बाबत मी तक्रारदार महिलेशी चर्चा करणार आहे. त्यांनी सांगितलं तर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी दुसरा अधिकारी देण्याचीही विनंती करणार आहे,” असे अ‌ॅड. रमेश त्रिपाठी म्हणाले.

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडेंची चौकशी व्हायला हवी, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे; निलेश राणेंची आग्रही मागणी

मुंडे प्रकरणावर बीड जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रात काय?; वाचा बित्तंबातमी

Dhananjay Munde Case : हेगडेंकडूनच माझ्याशी बोलायला सुरुवात, सरनाईकांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भेटलो; रेणू शर्मांचा दावा

Renu Sharma’s lawyer Ramesh Tripathi alleges death threats

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.