मोदी सरकारला 80 वर्षांच्या शरद पवारांची भीती: धनंजय मुंडे
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. (Dhananjay Munde)
पुणे: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी देशातील मोदी सरकारमधील नेत्यांना 25 वर्षाच्या एखाद्या नेत्याची भीती असते, अगदी तशीच भीती 80 वर्षांच्या शरद पवार यांची आहे, असं वक्तव्य केलं आहे. “होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याच होतं हे आपण ऐकतो, ते शरद पवार साहेबांनी सत्यात उतरवून दाखवलं,” असं धनंजय मुंडे म्हणाले. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीने भाजप बदनाम करत आहे, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. खाल्लेल्या अन्नाला तरी जागा, असं आव्हान मुंडे यांनी दिलं. शेतकरी जगाला तर आपण जगू म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या, आणि शेती करत नसला तरीही पाठिंबा द्यावा , असं आवाहन धनजंय मुंडे यांनी केले. (Dhananjay Munde criticize BJP)
शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन करण्यात आले. हा धागा पकडत धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सत्ता देणाऱ्या जनतेचं म्हणणं ज्यांना श्रवणातून ऐकू येत नसेल त्यांना श्रवणाखाली द्यायला हवी? कारण, त्याची मशीन अद्याप निर्माण झालेली नाही, अशा वेळी हाताचा वापर करावा लागतो, असा टोला मुंडे यांनी लगावला. (Dhananjay Munde criticize BJP)
दिव्यांगांना न्याय देईना हा शरद पवारांना विश्वास
मला दिव्यांगांचं खातं का दिलं. याबाबत अनेक उलट सुलट चर्चा सुरू होत्या. माझा लहान भाऊ कर्णबधीर आणि मुकबधीर आहे. याची कल्पना शरद पवार यांना आहे आणि म्हणूनच त्यांनी मला हे खातं दिलं. मी या दिव्यांगांना तळमळीने न्याय देईन, हा त्यांना विश्वास आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले. राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी चांगलं काम करणार असल्याचा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. (Dhananjay Munde criticize BJP)
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या शिरुर लोकसभा मतदारसंघात मोफत श्रवणयंत्र वाटप शिबीराचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना यापुढे आधी श्रवणयंत्रांचे वाटप करू आणि मग आपण आपली मनोगते करू, तेंव्हाच यांना ऐकू येतंय हे आपल्याला कळेल, असं धनंजय मुंडे म्हणाले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,पवार चॅरीटेबल ट्रस्ट,अपंग हक्क विकास मंच,ठाकरसी ग्रुप, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र,पुणे,महात्मा गांधी सेवा संघ आणि जगदंब प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रवण यंत्र वाटप शिबीर आयोजित करण्यात आले.
State Cabinet Meeting | आज दुपारी 3 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठकhttps://t.co/nRTnvpZh3d
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
संबंधित बातम्या:
शरद पवार, राहुल गांधींसह विरोधीपक्षांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार
शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावरुन भाजपची चौफेर टीका; नातू रोहित पवार मैदानात, भाजपला सडेतोड उत्तर
(Dhananjay Munde criticize BJP)