Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची ‘बॉबी डार्लिंग’, मनसे नेत्यांच्या टार्गेटवर मुंडे, अमेय खोपकर म्हणतात, हे तर ‘तात्या विंचू’

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत बोलताना मुंडे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख रामदास पाध्ये यांचा बोलका बाहुला अर्धवटराव असा केला. त्यानंतर मनसे नेत्यांकडे मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. मनसेचे प्रवक्ते योगेश पिल्ले आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडेंवर तिखट शब्दात टीका केलीय.

Dhananjay Munde : धनंजय मुंडे म्हणजे राष्ट्रवादीची 'बॉबी डार्लिंग', मनसे नेत्यांच्या टार्गेटवर मुंडे, अमेय खोपकर म्हणतात, हे तर 'तात्या विंचू'
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्रीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 4:36 PM

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याची सभा आणि ठाण्यातील उत्तरसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. शरद पवार हे जातीपातीचं राजकारण करतात. 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवादाचं राजकारण सुरु झाल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. राज ठाकरेंच्या आरोपांना खुद्द शरद पवार यांनीही उत्तर दिलं. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी राज यांच्यावर जोरदार पटलवार केलाय. सांगलीच्या इस्लामपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेत बोलताना मुंडे यांनी राज ठाकरेंचा उल्लेख रामदास पाध्ये यांचा बोलका बाहुला अर्धवटराव असा केला. त्यानंतर मनसे नेत्यांकडे मुंडे यांना प्रत्युत्तर दिलं जातंय. मनसेचे प्रवक्ते योगेश पिल्ले आणि मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडेंवर तिखट शब्दात टीका केलीय.

राष्ट्रवादीची ‘बॉबी डार्लिंग’

मनसेचे प्रवक्ते योगेश चिल्ले यांनी धनंजय मुंडे यांचा उल्लेख राष्ट्रवादीची बॉबी डार्लिंग असा केलाय. आयुष्यात इतकं डार्लिंग, डार्लिंग केलं की, तिच डार्लिंग आता अंगाशी आलीय. छातीत कळ उगाच येते का? असा खोचक सवाल चिल्ले यांनी केलाय. चिल्ले यांनी धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड यांचा एक फोटो ट्वीट करत त्यावर तिखट शब्दात टीका केलीय.

‘तात्या विंचू’चा ओम फट स्वाहा करणार

दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी धनंजय मुंडे यांचा तात्या विंचू म्हणून उल्लेख केलाय. ‘अहो धनंजय मुंडेराव, तुम्ही त्यांची अर्धवटरावर म्हणून खिल्ली उडवताय, ते राजसाहेब तुमच्यासारख्या तात्या विंचूचा ओम फट स्वाहा करणार आहेत. राज साहेबांनी दे दणादण करायला आता कुठे सुरुवात केलीय. लवकरच तुमचा थरथराट होणार आहे’, असं ट्वीट करत खोपकर यांनी मुंडेंवर पलटवार केलाय.

धनंजय मुंडेंची राज ठाकरेंवरील टीका काय?

धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांचा अर्धवटराव असा उल्लेख केलाय. पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशा शब्दात मुंडे यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला हाणला. माणसं सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केलीय.

इतर बातम्या : 

आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला
'बच गया... दर्शन घे काकांचं..', अजितदादांनी रोहित पवारांना लगावला टोला.
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्..
मुख्यमंत्री कोण? आज होणार फैसला? महायुतीत दोन फॉर्म्युला निश्चित अन्...
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?
दारूण पराभवानंतर 'मविआ'चं भविष्य काय? एकत्र राहणार की दुभंगणार?.