Dhananjay Munde on Raj Thackeray : ‘भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु’, धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा ‘अर्धवटराव’ म्हणून उल्लेख!

इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत सर्वच नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार प्रहार केल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनीही राज यांच्यावर हल्ला चढवला. मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांची उपमा देऊन टाकली.

Dhananjay Munde on Raj Thackeray : 'भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु', धनंजय मुंडेंकडून राज ठाकरेंचा 'अर्धवटराव' म्हणून उल्लेख!
राज ठाकरे, धनंजय मुंडेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 10:50 PM

सांगली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन रान पेटवलं आहे. त्याचबरोबर गुढीपाडव्याची शिवतीर्थावरील सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेतही राज यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवारांनी जातीपातीचं राजकारण केलं. 1999 ला राष्ट्रवादीच्या जन्मापासून राज्यात जातीवाद वाढल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केलाय. या आरोपानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांना टार्गेट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेत सर्वच नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार प्रहार केल्याचं पाहायला मिळालं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनीही (Dhananjay Munde) राज यांच्यावर हल्ला चढवला. मुंडे यांनी राज ठाकरेंना रामदास पाध्ये यांच्या अर्धवटरावांची उपमा देऊन टाकली.

‘एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले’

धनंजय मुंडे यांनी राज ठाकरेंवर टीका करताना त्यांचा अर्धवटराव असा उल्लेख केलाय. पूर्वी रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांचा खेळ प्रसिद्ध होता. आता भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु आहे. अर्धवटरावांचा खेळ सुरु आहे. अर्धवटराव आधी भाजपविरोधात खुप बोलायचे, सीडी लावायचे. एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प बसले, अशा शब्दात मुंडे यांनी राज ठाकरेंना जोरदार टोला हाणला. माणसं सत्तेत आली की कशी माजतात हे मागच्या पाच वर्षात आपण पाहिलं, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केलीय.

‘पवारसाहेबांनी समतेचं राज्य उभं केलं’

राज यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांनाही मुंडे यांनी उत्तर दिलंय. जातीयवादी राजकारण करतो म्हणून सांगता. चार खासदार त्यांनी पाठवले. पवार साहेबांनी समतेचं राज्य उभं केलं. भुजबळसाहेबांना, अमोल मिटकरींना, मला, अशी किती नावं आहेत, त्यांना मोठी पदं दिली. तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे, असा घणाघात मुंडे यांनी केलाय.

‘जयंत पाटलांचं स्वप्न नक्की पूर्ण होणार’

जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष बनला. राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्रीही होईल पण असा होणार नाही. जयंत पाटील साहेबांचं स्वप्न आहे की राष्ट्रवादीचे 100 आमदार निवडून आणायचे. हे स्वप्न नक्की पूर्ण होणार, असा दावाही मुंडे यांनी परिवार संवाद यात्रेत केलाय.

इतर बातम्या :

BJP Polkhol Abhiyan : ‘ऊठ मुंबईकर ऊठ, उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट’, मुंबई महापालिकेसाठी मुनगंटीवारांचा नारा, शिवसेनेवर हल्लाबोल

Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती

Yashomati Thakur : ‘तरुणांमध्ये अस्वस्थता पसरवणं एका डॉक्टरला शोभत नाही’, यशोमती ठाकूरांचा बोंडेंवर पलटवार

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.