धनंजय मुंडे ओबीसी नेते, राष्ट्रवादीला काय सूचवायचंय?; भाजपची कोंडी?

बलात्कार प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांना भाजपने घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. (dhananjay munde rape case: ncp playing obc card?)

धनंजय मुंडे ओबीसी नेते, राष्ट्रवादीला काय सूचवायचंय?; भाजपची कोंडी?
Follow us
| Updated on: Jan 16, 2021 | 3:23 PM

मुंबई: बलात्कार प्रकरणात अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांना भाजपने घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण राष्ट्रवादीने मुंडेंचा उल्लेख ओबीसी नेते असा करून भाजपचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे भाजपला मुंडेंविरोधातील धार बोथट करावी लागेल, असं राजकीय सूत्रांनी सांगितलं. (dhananjay munde rape case: ncp playing obc card?)

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे हे ओबीसी समाजाचे नेते आहेत. भाजप ओबीसी समाजाच्या नेत्यांमागे उभी राहत नाही, मात्र राष्ट्रवादी मुंडे यांचा या प्रकरणात दोष नसेल तर पाठीमागे ताकदीनिशी उभा राहील, असं वक्तव्य पाटील यांन केलं होतं. प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य करून पाटील यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचं काम केलं आहे. भाजप नेते ओबीसींचा केवळ मतांसाठीच वापर करत असल्याचं सांगतानाच भाजप ओबीसीविरोधी आहे, हे सूचवण्याचा प्रयत्नही पाटील यांनी या निमित्ताने केला आहे.

भाजप आणि तीन ओबीसी नेते

भाजपने तीन बड्या ओबीसी नेत्यांना वाऱ्यावर सोडल्याचा जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामागचा हेतू आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे भाजपमध्येच होते. खडसे हे ओबीसी आहेत. सत्ता आल्यानंतर त्यांनी बहुजन मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी केली होती. तेव्हापासून त्यांना भाजपने अडगळीत टाकण्यास सुरुवात केली होती. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून त्यांचा राजीनामा घेऊन त्यांचा पत्ता कापण्यात आला. त्यानंतर निवडणुकीत त्यांचं तिकीट कापून त्यांना विजनवासात पाठवण्यात आलं. भाजपला वाढवण्याचं योगदान देणाऱ्या खडसेंवरच भाजपने पक्ष सोडण्याची वेळ आणून सोडली.

दुसऱ्या ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांनीही मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं म्हटलं होतं. या विधानानंतर त्यांच्याही राजकीय कारकिर्दीला उतरता कळा लागली. त्यांच्यामागे चिक्की घोटाळ्याचा ससेमिरा लागला. विधानसभान निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानतंर त्यांना विधानपरिषदही देऊ केली नाही. एवढेच नव्हे तर त्यांना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही स्थान देण्यात आलं नाही. त्यांची केंद्राच्या कार्यकारिणीवर वर्णी लावून राज्याच्या राजकारणातून एकप्रकारे बेदखल करण्याचाच प्रयत्न करण्यात आला. तर चंद्रशेखर बावनकुळे या ओबीसी नेत्याचाही निवडणुकीतून पत्ता कट करण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर जयंत पाटील यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

ओबीसींना जवळ करण्याचा प्रयत्न

भाजप ओबीसींना वाऱ्यावर सोडते पण आम्ही ओबीसींच्या पाठी उभे राहतो, असं सांगून मुंडेंच्या निमित्ताने ओबीसींना जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंडे यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. तसेच ते ओबीसींचा चेहरा आहेत. खडसेही राष्ट्रवादीवासी झाल्याने राष्ट्रवादीला ओबीसींची फळी मजबूत करायची आहे. त्यामुळेच खडसे असो की मुंडे या ओबीसी नेत्यांच्या पाठी भाजप नव्हे तर राष्ट्रवादीच उभी राहते असे सूचवून पाटील यांनी ओबीसींना योग्य ते संकेत दिले आहेत. आगामी काळात भाजपच्या सोबत जायचं की राष्ट्रवादीच्या? हे तुम्हीच ठरवा असंही त्यांना सूचवायचं आहे. मुंडेंवर झालेले आरोप आणि खडसेंच्या पाठी लागलेली ईडी या पार्श्वभूमीवर आता ओबीसींचीच एकजूट करण्यावर राष्ट्रवादीचा भर असेल, असं सूत्रांनी सांगितलं. (dhananjay munde rape case: ncp playing obc card?)

संबंधित बातम्या:

धनंजय मुंडे राजीनामा द्या, भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन

मै जब भी बिखरा हूँ, दुगनी रफ्तारसे निखरा हूँ, धनंजय मुंडे प्रकरण रेणू शर्मांवरच बूमरँग होतंय?

Dhananjay Munde LIVE: मुंडे प्रकरणातील सर्व पुरावे पोलिसांना देणार : रेणू शर्मा यांचे वकील

धनंजय मुंडेंचा रेणू शर्मावर गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव; वकिलाचा दावा

(dhananjay munde rape case: ncp playing obc card?)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.