AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनंजय मुंडे पहाटेपासून शासकीय बंगल्यात, समर्थक आणि अधिकारीही जमले

धनंजय मुंडे भल्या पहाटेच चित्रकूट बंगल्यात दाखल झाले असून कार्यकर्तेही तिथे पोहोचले आहेत. (Dhananjay Munde Chitrakoot Bungalow)

धनंजय मुंडे पहाटेपासून शासकीय बंगल्यात, समर्थक आणि अधिकारीही जमले
| Updated on: Jan 14, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) पहाटेपासूनच आपल्या शासकीय निवासस्थानी आहेत. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या भेटीसाठी चित्रकूट बंगल्याबाहेर कार्यकर्ते दाखल झाले आहेत. आज दिवसभर मुंडे चित्रकूटमधूनच कारभार चालवण्याची शक्यता आहे. (Dhananjay Munde Supporters Gather at Chitrakoot Bungalow)

धनंजय मुंडे भल्या पहाटेच चित्रकूट बंगल्यात दाखल झाले. त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते निवासस्थानावर दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे यांनी घराबाहेर न पडता आपल्या खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही निवास्थानावरच बोलवले आहे. शासकीय अधिकारी आणि मुंडे यांच्यात बैठकही सुरु आहे. आज दिवसभर धनंजय मुंडे हे आपल्या शासकीय निवासस्थानातूनच कारभार चालवण्याची शक्यता आहे.

मीडियाला कळू न देता धनंजय मुंडे चित्रकूटवर

मुंबईच्या मलबार हिल येथील चित्रकूट बंगल्यावर येताना गुरुवारी पहाटेही धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना खबर लागणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली. पहाटे अडीच-तीनच्या सुमारास धनंजय मुंडे एका खासगी गाडीतून चित्रकूट बंगल्यावर आले. या गाडीच्या काचा काळ्या असल्यामुळे आत नेमके कोण बसले आहे, याचा अंदाज पटकन येणे शक्य नव्हते. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासोबत नेहमीप्रमाणे पोलीस आणि सुरक्षारक्षकांचा ताफा नव्हता. ते एकटेच चित्रकूट बंगल्यावर आले होते.

बलात्काराच्या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकीर्द धोक्यात आली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे सध्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे. (Dhananjay Munde Supporters Gather at Chitrakoot Bungalow)

अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवार यांच्या भेटीला

धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करुन आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिल्यानंतर प्रचंड गदारोळ माजला आहे. विरोधी पक्षांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी बुधवारी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडल्याचे समजते. तत्पूर्वी बुधवारी धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर धनंजय मुंडे छगन भुजबळ यांच्या भेटीलाही गेले होते. त्यामुळे आता नेमके काय घडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मकरसंक्रांतीनिमित्त ट्विट

“कटुतेवर मात करत जीवनात गोडवा आणणारा आनंददायी सण म्हणजे मकर संक्रांत! मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तीळ गुळ घ्या आणि गोड बोला.” असं लिहित धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर तीळगुळाची इमेज शेअर केली आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने ‘धनूभाऊं’च्या आयुष्यात आलेली कटुता दूर व्हावी, अशी आशा त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या :

“कटुतेवर मात करत…” बलात्काराच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांचे आणखी एक ट्विट

धनंजय मुंडे यांची आमदारकी धोक्यात आहे का?

(Dhananjay Munde Supporters Gather at Chitrakoot Bungalow)

ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.