AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप खासदार सुभाष भामरेंना धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीत धक्का, भावाचा पराभव; 3 माजी आमदारांनी गड राखला

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

भाजप खासदार सुभाष भामरेंना धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीत धक्का, भावाचा पराभव; 3 माजी आमदारांनी गड राखला
धुळे नंदूरबार जिल्हा बँक निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा जल्लोष
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 4:12 PM
Share

धुळे: धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये तीन माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु या तीनही माजी आमदारांनी आपला गड राखत दणदणीत विजय मिळवला आहे. यामध्ये नंदुरबारचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी त्याचबरोबर धुळ्याचे माजी आमदार शरद पाटील तसेच माजी आमदार राजवर्धन कदमबांडे या तीनही माजी आमदारांनी विजय मिळवला आहे. धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सुभाष भामरे यांच्या भावाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

सुभाष भामरेंच्या भावाचा माजी आमदारांकडून पराभव

धुळे जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी मतदान झालं होतं. भाजप नेते माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार सुभाष भामरे यांचे भाऊ सुरेश रामराव पाटील यांचा पराभव झाला आहे. सुभाष भामरे यांना चांगलाच धक्का मानला जातो आहे. माजी आमदार शरद पाटील यांनी सुभाष भामरे यांच्या भावाचा पराभव केला आहे.

निवडणुकीदरम्यान भाजप,काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचे बघायला मिळाले. तर. शिवसेनेने मात्र वेगळी चूल मांडल्यामुळे यामध्ये सर्वपक्षीय आघाडीत शिवसेनेतर्फे बिघाडी करण्यात आल्याची चर्चा आहे. भाजपच्या आठ उमेदवारांचा विजय झाला असून इतर नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे उमेदवार विजय झाले आहे.

धुळे नंदुरबार जिल्हा बँक निवडणुकीमध्ये माजी मंत्री तथा आमदार अमरीश भाई पटेल यांनीदेखील या निवडणुकीत चांगलाच जोर लावला होता. तसेच माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या शेतकरी विकास पॅनलचे सर्वाधिक उमेदवार असल्या कारणाने धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेच्या सत्तेची चावी पुन्हा एकदा राजवर्धन कदमबांडे यांच्याच हातात जाणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

7 जागा यापूर्वीच बिनविरोध

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या नऊ मतदार संघातील 17 जागांसाठी काल निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. 17 पैकी दहा जागांसाठी मतदान झालं होतं. 17 पैकी 7 जागांवर बिनविरोध निवड झाली होती.

इतर बातम्या:

Uddhav Thackeray | मुख्यमंत्र्यांच्या शस्त्रक्रियेमुळं हिवाळी अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता

Dhule Nandurbar District Bank Election result three ex mla manage to continue their control on bank

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.