विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तिकीटावर काँग्रेसचा माजी आमदार
अमरिश पटेल यांना भाजपने धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे Vidhan Parishad Bypoll Amrish Patel
नवी दिल्ली : काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी अमरिश पटेल आता भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरले आहेत. राज्यसभा उमेदवारांच्या दुसऱ्या यादीसह भाजपने धुळे नंदुरबार मतदारसंघातून अमरिश पटेल यांना उमेदवारी जाहीर केली. (Vidhan Parishad Bypoll Amrish Patel)
धुळे नंदुरबार विधानपरिषदेच्या रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मार्चच्या पहिल्या आठवडण्यात पोटनिवडणूक जाहीर केली होती. काँग्रेसला रामराम ठोकून भाजपचा झेंडा हाती धरताना अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या जागेसाठी 30 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे 31 मार्चला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असल्यामुळे धुळे विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठीही शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची एकजूट होण्याची चिन्हं आहेत. महाविकास आघाडीतर्फे कोणाला रिंगणात उतरवलं जाणार याची उत्सुकता आहे. त्यामुळे अमरिश पटेलांना आपली जागा टिकवता येणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
कोण आहेत अमरिश पटेल?
अमरिशभाई रसीकलाल पटेल हे धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेतून विधानपरिषदेवर निवडून आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले होते. परंतु विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पटेल यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपची वाट धरली होती.
मूळ प्रकरण वाचा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धुळे जिल्ह्यात काँग्रेसला खिंडार
विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे अमरिश पटेल यांनी विधानपरिषदेचा राजीनामा सुपूर्द केला होता. त्यावेळी अमरिश यांचे बंधू आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेलही उपस्थित होते
Congratulations Dr Bhagwat Karad ji and Amrishbhai Patel for being nominated as @BJP4Maharashtra candidates for #RajyaSabhaElections & Legislative Council Election respectively. Wishing you both the very best ! pic.twitter.com/j1Hv0t02Z9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 12, 2020
Vidhan Parishad Bypoll Amrish Patel
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख उद्या (शुक्रवार 13 मार्च) आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार आहे.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार
- उदयनराजे भोसले – भाजप
- भागवत कराड – भाजप
- रामदास आठवले – भाजप पुरस्कृत
- शरद पवार – राष्ट्रवादी
- फौजिया खान – राष्ट्रवादी
- राजीव सातव – काँग्रेस (अधिकृत घोषणा बाकी)
- प्रियांका चतुर्वेदी – शिवसेना
Vidhan Parishad Bypoll Amrish Patel