तुम्ही नागपूर पोलीस कमिश्नरची भेट घेतली? संजय राऊत म्हणाले, माझा इथं आता तळ असेल !
महाराष्ट्रात समजा एखादा पक्षाच्या नावाखाली महाराष्ट्राची बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेलतर त्याची आरती करावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी.
मुंबई – नागपूरमध्ये (nagpur) शिवसेना नेत खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी पोलिस आयुक्तांची (Commissioner of Police) भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी संजय राऊत म्हणाले की, ही माझी आणि त्यांची सदिच्छा भेट होती. दोन वर्षाच्या कालावधीनंतर संजय राऊत नागपूरात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. परंतु त्यांनी माझे आणि पोलिस आयुक्तांचे संबंध चांगले असल्याने मी त्यांची भेट घेतल्याचे सांगितले. त्याचबरोबर तुम्ही ज्यांची नाव घेतली त्यासाठी मला आयुक्तांची भेट घेण्याची कधीही गरज वाटलेली नाही. मला जे काही जाहीर करायचं असेल ते मी नागपूरमध्ये येऊनचं जाहीर करेन. नागपूरला मी दोन वर्षांनी आलोय, नागपूरात खूप काही बदल झालाय, अधिवेशन काळानंतर आलोय, कोविड काळात येऊ शकलो नाही, पण मी आता नागपूरला येणं सुरू करतोय निवडणुका वगैरे आहेतचं पण नागपूर आणि विदर्भाच्या संघटनात्मक बांधणीसाठी मला नागपूरात यावे लागणार आहे.
शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे
जे महाराष्ट्रद्रोही आहेत आणि जे भ्रष्टाचारी आहेत, ज्याच्याविषयी महाराष्ट्र मनामध्ये कायम द्वेश आहे, अशा लोकांना जी भाषा समजते, त्या भाषेतचं बोलावं अस आमच्या साधू संतांनी सांगितलं आहे. हजारो मारावे एक उरावा अशा पध्दतीचं राजकारण काही भाजपचे नेते करीत आहेत. मागील अनेक दिवसांपासून भाजपाचे नेते किरीट सोमय्या संजय राऊत यांच्यावरती भ्रष्टाचार केल्याचे आरोप करीत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे, त्यावर संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर टीका केली. मागच्या काही दिवसांपासून राजकारणाचा स्तर घसरल्याचे पाहायला मिळतंय. पण असं काही असं म्हणतं महाराष्ट्राला एक पंरपरा आहे पण शिवसेनेची एक वेगळी भाषा आहे असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रावर एखादा थुंकत असेल तर आम्ही त्याची आरती करणार नाही
महाराष्ट्रात समजा एखादा पक्षाच्या नावाखाली महाराष्ट्राची बदनामी करीत असेल किंवा थुंकत असेलतर त्याची आरती करावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खुशाल त्यांची आरती करावी. आम्ही अत्यंत सौम्य भाषा वापरली आहे. तसेच ज्यांना या भाषेविषयी शंका आहे. त्यांनी आपली मराठी डिक्शनरी पाहावी किंवा साधुसंतांची पुस्तक वाचावी असा सल्ला संजय राऊत यांनी टीकाकारांना दिला आहे. तसेच महाराष्ट्रातल्या लोकांना कुणीही मराठी शिकवू नये असंही ते म्हणाले आहेत. चांगल्या कामासाठी किंवा देशाच्या विकासाठी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊन काम करणार असेल तर नक्कीचं लोकशाहीत त्याचं स्वागत व्हायला हवं. पण काही लोकांना या देशाच्या लोकशाहीचा अर्थ समजलेला दिसत नाही असं वाटतंय ऐवढं बोलून त्यांनी देशातल्या अनेक नेत्यांना चिमटा काढला.