…. तेव्हा मी राष्ट्रवादीचा झालो, दिलीप सोपलांनी बाळासाहेबांची आठवण सांगितली

शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी प्रथमच जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.

.... तेव्हा मी राष्ट्रवादीचा झालो, दिलीप सोपलांनी बाळासाहेबांची आठवण सांगितली
Follow us
| Updated on: Sep 05, 2019 | 1:55 PM

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा (Shiv sena) निर्धार मेळावा सोलापुरात पार पडला. यावेळी पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी प्रथमच जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.  त्यांनी नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत भाषण केलं.

पक्षात जास्त काम करणाऱ्याचे तिकीट कापले जाते, त्यामुळे मी चिन्ह बदलल्याशिवाय निवडून येतंच नाही, असं दिलीप सोपल (Dilip Sopal) म्हणाले. एकच चिन्ह रिपीट झालं की पडतो. त्यामुळे मी चिन्ह बदलत बदलत इथपर्यंत आलो, अशी मिश्किल टोलेबाजी सोपलांनी केली.

“कधी कधी माझं तिकीट कटलं गेलं. मग मी कटलं तर कटलं आपलं पाप फिटलं असं म्हणत काम करत राहिलो. लोकांचं चिन्ह नीट असेल तर आपलं चिन्ह व्यवस्थित असतं. जीवनात अनेक कटू आठवणी असतात, मात्र त्या उगाळत बसायच्या नसतात. एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात आल्यानंतर आधीच्या लोकांना चांगलं- वाईट न बोलण्यात अर्थ नसतो”, असं सोपल म्हणाले.

संघटना मजबूत

“शिवसेना हे एक वेगळंच रसायन आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोण आलं कोण गेलं याचं काहीच घेणे देणे नसते. बाळासाहेबांचे विचार आजही जिवंत. म्हणून कार्यकर्ते बाळासाहेबांच्या पाठीशी आहेत. अनेक भाकीत करणारे तोंडघशी पडले. मात्र अनेक संकटांना तोंड देत उद्धव ठाकरेंनी संघटना मजबूत ठेवली”, असंही दिलीप सोपल यांनी नमूद केलं.   

…. तेव्हा राष्ट्रवादीचा झालो

अपक्ष निवडणूक लढल्यानंतर मी शिवसेनेला साथ दिली. साहेबांची (बाळासाहेबांची) आणि माझी वेव्ह लेन्थ जुळते, हे काही जणांना आवडलं नाही. त्यामुळे मला कट केलं गेलं आणि मी राष्ट्रवादीचा झालो, असं दिलीप सोपल यांनी सांगितलं.

नखं काढून गुदगुल्या करतो

उद्धव ठाकरे मला म्हणाले तुम्ही टीका करताना चिमटा काढत नाही गुदगुल्या करता. मी म्हणालो मी नख काढून गुदगुल्या करतो आणि नंतर चिमटाही घेतो, असं सोपल म्हणताच एकच हशा पिकला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.