दिल्लीकरांनो I Love You, हनुमानजींचेही आभार : अरविंद केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal on Delhi Election result) यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले.

दिल्लीकरांनो I Love You, हनुमानजींचेही आभार : अरविंद केजरीवाल
Follow us
| Updated on: Feb 11, 2020 | 4:04 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal on Delhi Election result) यांनी विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर जनतेचे आभार मानले. दिल्लीतील आपच्या कार्यालयाबाहेर केजरीवालांनी माध्यमांशी संवाद साधला. केजरीवाल म्हणाले, “सर्व दिल्लीवासीयांचे आभार. त्यांनी मला तिसऱ्यांदा निवडून देऊन ही संधी दिली. हा कामाचा विजय आहे, हा देशाचा विजय आहे, हा भारतमातेचा विजय आहे”, असं केजरीवाल (Arvind Kejriwal on Delhi Election result) म्हणाले.  दिल्लीवालो आपने कमालही कर दिया, I Love You, असं म्हणत केजरीवालांनी दिल्लीकरांवरील प्रेम जाहीर केलं.

दिल्लीतील मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल समर्थकांशी संवाद साधत होते. केजरीवाल म्हणाले, “दिल्लीकरांनो तुम्ही कमालच केली. दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा त्यांच्या मुलावर विश्वास दाखवला. हा विजय त्या प्रत्येक कुटुंबाचा आहे ज्यांनी मला आपला मुलगा समजून पाठिंबा दिला. दिल्लीच्या नागरिकांनी देशात नव्या राजकारणात जन्म दिला आहे, ते म्हणजे कामाचं राजकारण”

दिल्लीच्या नागरिकांनी देशाला संदेश दिला की, जो शाळा बांधेल, परिसरात स्वच्छता ठेवेल, विकासकामे करेल, त्यालाच मते मिळतील. हेच राजकारण देशाला 21 व्या शतकात घेऊन जाईल.

आज मंगळवार आहे आणि हनुमानाचा दिवस आहे. हनुमानाचेही खूप खूप धन्यवाद, असं केजरीवाल म्हणाले.

ज्यांनी मला आपला मुलगा मानत हे सगळं प्रेम दिलं, ज्यांच्या घरात चांगलं शिक्षण मिळालं, गरजा पूर्ण झाल्या त्या प्रत्येकाचा हा विजय आहे. एका नव्या राजकारणाचा जन्म दिला आहे.  जो काम करेल, त्यालाच मत मिळेल. देशाला हे उदाहरण दिल्लीने दिलं आहे. देशासाठी हा मोठा शुभसंदेश आहे. हा आपल्या भारतमातेचा विजय, हा देशाचा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले.

आज मंगळवार आहे. हनुमानाचा दिवस आहे, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी हनुमान चालिसावरुन भाजपला टोला लगावला. केजरीवालांनी एका मुलाखतीत हनुमान चालिसा म्हणून दाखवली होती. त्यावरुन दिल्लीच्या प्रचारात चांगलंच राजकारण रंगलं होतं. भाजपने केजरीवालांवर टीका करत, हा ‘चुनावी हनुमान भक्त’ असल्याचं म्हटलं होतं.

दिल्ली विधानसभा निकाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे.  दिल्ली विधानसभेच्या 70 जागांपैकी 63 जागांवर आघाडी घेत, ‘आप’ने पुन्हा दिल्लीवर झेंडा फडकावला आहे. (Delhi Vidhansabha Election Result) अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक करत, तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार हे  निश्चित आहे. दुसरीकडे ‘आप’कडून सत्ता खेचून आणण्यात भाजपला अपयश आलं आहे. तर काँग्रेसचा पुन्हा सुपडासाफ झाला आहे. (Delhi Vidhansabha Election Result)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.