धनराज महाले लोकसभेला राष्ट्रवादीत, आता विधानसभेला पुन्हा शिवसेनेत

दिंडोरीचे (Dindori) माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजार महाले (Dhanaraj Mahale) स्वगृही परतणार आहेत.

धनराज महाले लोकसभेला राष्ट्रवादीत, आता विधानसभेला पुन्हा शिवसेनेत
Follow us
| Updated on: Aug 16, 2019 | 11:17 AM

नाशिक : दिंडोरीचे (Dindori) माजी आमदार आणि लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार धनजार महाले (Dhanaraj Mahale) स्वगृही परतणार आहेत. धनराज महाले पुन्हा शिवसेनेत (Shiv Sene) प्रवेश करत आहेत. महाले हे पूर्वी शिवसेनेत होते. ते शिवसेनेचे माजी आमदार आहेत. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

राष्ट्रवादीने त्यांना दिंडोरी मतदारसंघातून तिकीट दिलं होतं. मात्र भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी त्यांचा पराभव केला. महत्त्वाचं म्हणजे भारती पवार यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीवेळी पक्ष बदलून, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये सहभागी झाल्या आहेत.

धनराज महाले हे माजी खासदार हरीभाऊ महाले यांचे पुत्र आहेत. 2009 साली ते दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते.  मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. यंदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीत हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या भारती पवार यांना तिकीट दिल्याने, धनराज महाले यांनी शिवसेना सोडली.

भारती पवार यांनी 2014 मध्ये राष्ट्रवादीतून लोकसभा निवडणूक लढली होती. यंदा त्या भाजपमध्ये गेल्याने राष्ट्रवादीने धनराज महाले यांना तिकीट दिलं होतं.

कोण आहेत धनराज महाले?

  • धनराज महाले हे शिवसेनेचे माजी आमदार आहेत.
  • दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचं त्यांनी नेतृत्त्व केलं.
  • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नरहरी झरवळ यांनी त्यांचा पराभव केला
  • लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता
  • धनराज महाले हे समाजवादी नेते आणि माजी खासदार (कै) हरीभाऊ महाले यांचे चिरंजीव आहेत

लोकसभा निवडणूक निकाल

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांनी बाजी मारली. त्यांनी राष्ट्रवादीचे धनराज महाले यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिलला चौथ्या टप्प्यात मतदान झाले. इथे यंदा 64 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या 2014 मध्ये या मतदारसंघात 63. 40 टक्के इतके मतदान झाले होते. 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये 0.60 इतकी मतदानाची वाढ झाल्याचे दिसून आले. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते .मात्र भाजप-सेना महायुतीकडून डॉक्टर भारती पवार, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून धनराज महाले तर माकपकडून जे पी गावित या प्रमुख उमेदवारात लढत झाल्याने या मतदार संघात तिरंगी लढत बघायला मिळाली.

संबंधित बातम्या  

फोडाफोडीला सुरुवात, भुजबळांच्या जिल्ह्यात शिवसेनेचा माजी आमदार राष्ट्रवादीत   

Dindori Lok sabha result 2019 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ निकाल  

राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार, काँग्रेसचे प्रवीण छेडा यांचा भाजपमध्ये प्रवेश 

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.