“आजपासून तुम्ही स्वयंघोषित हिंदुजननायक!, अयोध्येला जायची गरज नाही”, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. त्यानंतर त्यांच्या रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलंय.

आजपासून तुम्ही स्वयंघोषित हिंदुजननायक!, अयोध्येला जायची गरज नाही, दिपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 3:45 PM

मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) त्यांच्या रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या सध्या विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षातील नेत्यांना धारेवर धरत आहेत. आता त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधलाय. “आजपासून तुम्ही स्वयंघोषित हिंदुजननायक!, अयोध्येला (Ayodhya) जायची गरज नाही”, असं म्हणत दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

दिपाली सय्यद यांचं ट्विट

राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाला. त्यानंतर त्यांच्या रखडलेल्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलंय. “आम्ही म्हणतोय ना तुम्हाला स्वयंघोषीत हिंदुजननायक मग अयोध्याला जायाची गरज काय आहे. आजपासून तुम्ही स्वयंघोषीत हिंदुजननायक!”, असं ट्विट दिपाली यांनी केलं आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंचा रखडलेला अयोध्या दौरा

काही दिवसांआधी राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशमधले खासदार बृजभूषण सिंह यांनी थेट इशारा दिला. “राज ठाकरे यांनी भूमीपुत्रांचा मुद्दा पुढे करत उत्तर भारतीयांना हिणवलं. त्यामुळे अयोध्येत यायचं असेल तर माफी मागावी अन्यथा पाय ठेवू देणार नाही”, असं ओपन चॅलेंज बृजभूषण सिंह यांनी दिलं. आधी सौम्य वाटणारा हा विरोध नंतर तीव्र झाला. अखेर राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा रद्द झाल्याची घोषणा केली. याच मुद्द्याच्या आधारे दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

राज ठाकरे आणि हिंदुत्व

राज ठाकरे मागच्या काही दिवसांपासून हिंदुत्वाच्या बाबतीत अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांनी त्यांच्या जाहीर सभांमधून हिंदुत्वाचा आवाज अधिक दृढ केला. तर मस्जिदीवरच्या भोंग्याच्या मुद्द्यांवरून त्यांनी आवाज उठवला. शिवाय काही दिवसांआधी त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडाही बदलला. आधी मनसेच्या झेंड्यावर रेल्वे इंजिन पाहायला मिळायचं. तर आता त्यांच्या झेंड्याचा रंग भगवा झालाय. शिवाय शिवमुद्रेचाही झेंड्यात समावेश केला.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.