उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला थेट पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधून पाठिंबा; BMC निवडणुकीत सहभागी होणार
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पंजाब शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबईत दाखल झाले आहे. उद्धव ठाकरेंसोबत आमची बैठक आहे. या भेटी दरम्यान आम्ही हजारो शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फॉर्म देणार असल्याचे शर्मा यांनी सांगीतले.
मुंबई : शिवसेना कुणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. मुळ शिवसेना आमचीच असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत आहे. त्यातच स्वत:ची ताकद सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंसह(Uddhav Thackeray) युवासेना नेते आदित्य ठाकरे(Aditya Uddhav Thackeray) पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दुसरीकडे मुंबई महापालिकेवर भाजपचा डोळा आहे. मुंबई महापालिका ताब्यात ठेवण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्यातच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला थेट पंजाब(Punjab) आणि हिमाचल प्रदेशमधील(Himachal Pradesh) शिवसैनिकांकडून पाठिंबा मिळाला आहे. BMC निवडणुकीत सहभागी होण्याचा निर्णय पंजाब आणि हिमाचल प्रदेशमधील शिवसैनिकांनी घेतला आहे.
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून आलेले शिवसैनिक मातोश्रीवर पोहोचले
पंजाब आणि हिमाचल प्रदेशातून आलेले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले आहेत. पंजाब शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष योगराज शर्मा आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह मुंबईत दाखल झाले आहे. उद्धव ठाकरेंसोबत आमची बैठक आहे. या भेटी दरम्यान आम्ही हजारो शिवसेना पदाधिकाऱ्यांचे फॉर्म देणार असल्याचे शर्मा यांनी सांगीतले.
पंजाब आणि हिमाचल प्रदेशात बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे अनेक लोक
पंजाब आणि हिमाचल प्रदेशात बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे अनेक लोक आहेत. शिवसेना सोडलेल्या आमदारांची शिवसेनेला पर्वा नाही. यांनी शिवसेना सोडली असली तरी शिवसेना मजबूत झाली असल्याचे या पंजाब आणि हिमाचल्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगीतले. मुंबईत राहणारे पंजाबी आणि हिमाचल प्रदेशातील नागरीक शिवसेनेला पाठिंबा देणार
पंजाबी आणि हिमाचल प्रदेशातून आलेले पदाधिकारी मुंबईत राहणाऱ्या पंजाबी आणि हिमाचल प्रदेशातील नागरीकांशी संवाद साधणार आहेत. महापालिका निवडणुकीत शिवसेनेत सहभागी होण्याचे आवाहन हे पदाधिकारी करणार आहेत.
भाजपकडून अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
मुंबई महापालिका जिंकण्यासाठी भाजपने देखील कंबर कसली आहे. भाजपकडून अमराठी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेषत: गुजराती, दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मेळावे घेत आहे. भाजप सारखा तगडा प्रतिस्पर्धी असताना शिवसेनेला पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या नागरीकांकडून मिळालेला पाठिंबा मोठा दिलासा ठरणार आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात मोठा राजकीय भूकंप केला
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत राज्यात मोठा राजकीय भूकंप केला 40 पेक्षा जास्त आमदारांना आपल्या सोबत घेऊन शिंदे सुरत मार्गे गुवाहाटी ला गेले यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले यानंतर राज्यात नव्हे शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले सोबतच सुरू झाला तो सत्ता संघर्ष एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेवर दावा केला जात आहे.