शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंद दाराआड चर्चा; प्रतिक्रिया देताना दोघेही म्हणाले सगळं OK, OK

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये कृषी विभागाची बैठक घेतली. बैठकी नंतर सत्तार थेट अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचले. सत्तार आणि चव्हाण यांच्यात बंद दारा आड तब्बल अर्धा तास चर्चा झाली. बंद दाराआड या दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. बाहेर येताना दोघांनीही सगळे ओक्के ओक्के असल्याची प्रतिक्रिया दिली.

शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्यात बंद दाराआड चर्चा; प्रतिक्रिया देताना दोघेही म्हणाले सगळं OK, OK
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 4:53 PM

नांदेड : शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची भेट घेतली दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचला उधाण आले आहे. या भेटीनंतर दोघही स्पष्टपणे काही बोलले नाहीत मात्र, सगळं OK, OK असल्याची प्रतिक्रिया या दोघांनी दिली. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी अब्दुल सत्तार थेट माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जाऊन पोहचले. चव्हाण यांच्या घरी जाऊन सत्तार यांनी त्यांची भेट घेतली. या दोघा नेत्यांची भेट ही दिवसभरातील मोठी राजकीय घडामोड ठरली आहे. सत्तार यांच्या नांदेड दौऱ्यापेक्षा या भेटीचीत जास्त चर्चा रंगलेय. यावेळी सगळे ओक्के ओक्के आहे अशी प्रतिक्रिया दोघांनीही दिली.

बंद दारा आड अर्धा तास चर्चा

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी नांदेडमध्ये कृषी विभागाची बैठक घेतली. बैठकी नंतर सत्तार थेट अशोक चव्हाण यांच्या शिवाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचले. सत्तार आणि चव्हाण यांच्यात बंद दारा आड तब्बल अर्धा तास चर्चा झाली. बंद दाराआड या दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात आहे. बाहेर येताना दोघांनीही सगळे ओक्के ओक्के असल्याची प्रतिक्रिया दिली.

अशोक चव्हाण माझे गुरू – अब्दुल सत्तार

अशोक चव्हाण हे माझे गुरू आहेत. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो अशी प्रतिक्रीया अब्दुल सत्तार यांनी दिली. तर, राजकारणात मतभेद असावेत पण व्यैयक्तीक मतभेद नसावेत अशी अपेक्षा अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. दरम्यान दोघांमध्ये अर्धा तास काय चर्चा झाली याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज सकाळी नांदेड जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी कासारखेडा, नांदुसा येथील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. सत्तार यांनी यावेळी थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांशी चर्चा करुन सत्तार यांनी खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. लवकरात लवकर पंचनामे पुर्ण करुन शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन सत्तार यांनी शेतकऱ्यांना दिले. सत्तार यांच्यासोबत आमदार बालाजी कल्याणकर, प्रभारी जिल्हाधिकारी परदेशी यांसह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.