काँग्रेसचे आमदार सोनिया गांधींना भेटणार, मुख्यमंत्र्यांसह स्वपक्षाच्या मंत्र्यांची तक्रार करणार? नेमकं काय घडणार?

महाविकास आघाडीत नाराजीचा सूर असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. सोमवारी कॉंग्रेसची (Congress) 15 आमदार दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. आज नाराज आमदार कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. सोमवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर सगळ्या आमदारांनी राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल यांची भेट घेतली.

काँग्रेसचे आमदार सोनिया गांधींना भेटणार, मुख्यमंत्र्यांसह स्वपक्षाच्या मंत्र्यांची तक्रार करणार? नेमकं काय घडणार?
मुख्यमंत्र्यांसह स्वपक्षीय मंत्र्यांविरुद्ध तक्रार करण्यासाठी कॉंग्रेसचे 15 आमदार दिल्लीत दाखलImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 7:52 AM

मुंबई – महाविकास आघाडीत नाराजीचा सूर असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. सोमवारी कॉंग्रेसची (Congress) 15 आमदार दिल्लीत (Delhi) दाखल झाले आहेत. आज नाराज आमदार कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. सोमवारी दिल्लीत दाखल झाल्यानंतर सगळ्या आमदारांनी राष्ट्रीय सचिव वेणुगोपाल यांची भेट घेतली. महाविकास आघाडीत समाविष्ठ असून देखील आमची कामे होत नसल्याची आमदारांची मागणी आहे. ही तक्रार करण्यासाठी कॉंग्रेसचे पंधरा आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे यापुर्वी देखील नाराज आमदारांनी पत्र लिहून सोनिया गांधी यांची भेट मागितली होती. कॉंग्रेसला महाविकास आघाडीत अधिक महत्त्व नसल्याचे नेहमी विरोधक टीका करीत असतात. ते आता सध्याच्या आमदारांच्या नाराजीवरून स्पष्ट दिसत आहे. काही आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट घेणं, यात वावग काय आहे असं नाना पटोले म्हणाले होते. आमचं प्रशिक्षण केंद्र दिल्लीतचं आहे.

या कारणांसाठी सोनिया गांधी यांची भेट घेणार

सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रातून काँग्रेस आमदार महाविकास आघाडीत किती नाराजी आहे दिसून आले आहे. काँग्रेसच्या वाट्याला येणारे विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. विविध महामंडळे, शासकीय समित्यांवरील नियुक्त्या अद्याप केलेल्या नाहीत. विशेष म्हणजे काही आमदारांची काँग्रेसच्या मंत्र्यांविरुद्ध तक्रार आहे. कॉंग्रेसचे काही आमदार आणि मंत्री पदाधिकाऱ्यांची कामे करीत नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या कारणांमुळे कॉंग्रेसचे आमदार आज सोनिया गांधींची भेट घेतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून त्यांच्यात वाद सुरू आहेत. हे सरकार अधिककाळ टिकणार नाही अशी टीका वारंवार विरोधकांकडून होत आहे. तसेच त्यांच्यात ताळमेळ नसल्याने महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते असं भाजपाच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. पण कॉंग्रेस आमदारांच्या जाहीर नाराजीनंतर हे सत्य असल्याचे उघड झालं आहे. तक्रार केल्यानंतर कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यावर काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल. त्याचबरोबर त्यांनी कॉंग्रेस आमदार आणि मंत्र्याविरोधातल्या तक्रारीवरती काय भूमिका घेतील हे सुध्दा आज आपल्याला समजेल.

बाबरी, अमरनाथ यात्रेकरुंचा संदर्भ, पाकड्या दहशतवाद्यांना धडकी भरवणारी भाषा मराठी, सामनातून संजय राऊतांचा भाजपला इशारा

Petrol Diesel Price : महागाईचा भडका! पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

Real Estate | घराचं स्वप्न आवाक्याबाहेर; घर खरेदी का झाली महाग? घेऊयात जाणून

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.