Chennai Mayor | चेन्नईत प्रथमच दलित महिला महापौर, Priya Rajan यांच्याकडे 28 व्या वर्षीच महापालिकेची सत्ता!
प्रिया राजन यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा चेंगई शिवम हे द्रमुकचे माजी आमदार होते. तर त्यांचे वडील आर राजन हे डीएमकेचे प्रादेशिक सहसचिव आहेत.
चेन्नईः तमिळनाडूतील सर्वात पहिल्या दलित महिला महापौर (first Dalit woman mayor) बनण्याचा मान चेन्नईच्या प्रिया राजन (Priya Rajan) यांना मिळाला आहे. ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या (Greater Chennai Mayor) महापौरपदाचा शपथविधी आज पार पडला. लवकरच त्या ग्रेटर चेन्नई महापालिकेचा कारभार चालवतील. 28 वर्षांच्या प्रिया राजन या चेन्नईच्या सर्वात तरुण महापौर आणि तिसऱ्या महिला महापौर आहेत. . तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात DMK कडून त्यांनी महापालिकेतील एका वॉर्डातून निवडणूक लढवली. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर महापौर पदासाठीची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. यात महापौरपदी प्रिया राजन विराजमान होतील, यावर शिक्कामोर्तब झाले.
प्रिया राजन 18 व्या वर्षापासूनच राजकारणात…
प्रिया राजन यांना मोठा राजकीय वारसा आहे. त्यांचे आजोबा चेंगई शिवम हे द्रमुकचे माजी आमदार होते. तर त्यांचे वडील आर राजन हे डीएमकेचे प्रादेशिक सहसचिव आहेत. तमिळनाडूतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये प्रिया राजन DMK पक्षाकडून निवडून आल्या आहेत. प्रिया राजन या उत्तर चेन्नईमधून 74 क्रमांकाच्या वॉर्डातून निवडून आल्या आहेत. ग्रेटर चेन्नई महापालिकेच्या महापौर पदासाठी प्रियासोबत बरेच जण स्पर्धेत होते. त्यांच्यासोबत श्रीधानी सी, नंधिनी आणि एस. अमूधा प्रिया आदी नावांचीही चर्चा होती. या सर्वांवर मात करत प्रिया यांनी महापौर पदाची खुर्ची जिंकली आहे. मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. मंगलापुरम येथील 28 वर्षीय प्रिया राजन यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. तमिळनाडूतील सर्व 21 स्वराज्य संस्थांमध्ये DMK चा विजय झाला आहे.
Tamil Nadu | Greater Chennai Corporation gets its youngest and first-ever Dalit woman mayor, as DMK’s R Priya takes the oath of office in Chennai. The 29-year-old is Chennai’s third woman mayor. pic.twitter.com/erfAt365h0
— ANI (@ANI) March 4, 2022
‘मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या कामगिरीचा प्रभाव’
28 व्या वर्षीच महापौर पदावर विराजमान होणाऱ्या प्रिया राजन म्हणतात, घरातच राजकारण असल्यामुळे अनेक वर्षांपासून मला अनुभव आहे. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत द्रमुक सत्तेत आली तेव्हापासून निवडणुकांप्रती अधिक रस निर्माण झाला. मुख्यमंत्री काहीतरी वेगळे प्रयत्न करतायत, हे पाहतेय. त्यामुळे त्यांच्या मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा झाली. त्यामुळेच मी ही निवडणूक लढवली, अशी प्रतिक्रिया प्रिया राजन यांनी दिली.
इतर बातम्या-