maharashtra political crisis : आम्हाला अपात्र करू नका, काँग्रेस, राष्ट्रवादीशिवाय होणाऱ्या सरकारलाच आमचा पाठिंबा; आमदार बालदी, अग्रवाल स्पष्ट बोलले

maharashtra political crisis : अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी विधान भवनात पोहोचले आहेत. मी या सभागृहाचा सदस्य आहे. 12 आमदारांना अपात्र ठरवू नका, अशी मागणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत.

maharashtra political crisis : आम्हाला अपात्र करू नका, काँग्रेस, राष्ट्रवादीशिवाय होणाऱ्या सरकारलाच आमचा पाठिंबा; आमदार बालदी, अग्रवाल स्पष्ट बोलले
आम्हाला अपात्र करू नका, काँग्रेस, राष्ट्रवादीशिवाय होणाऱ्या सरकारलाच आमचा पाठिंबा; आमदार बालदी, अग्रवाल स्पष्ट बोललेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 2:31 PM

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात अस्थिरतेची परिस्थिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत (maha vikas aghadi) एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना रोज दोन चार आमदार जाऊन मिळत असल्याने शिवसेनेच्या (shivsena) तंबूत खळबळ उडाली आहे. त्यामुळे एकूण 17 आमदारांना अपात्रं करण्याची शिफारस शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केली आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी हे विधानसभेत पोहोचले आहेत. त्यांनी आम्ही सभागृहाचे सदस्य आहोत. त्यामुळे आम्हलाा अपात्रं करू नका, अशी विनंती केली आहे. तशी विनंती करणारं पत्रंच या दोन्ही आमदारांनी विधानसभेच्या उपाध्यक्षांच्या कार्यालयाला दिले आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी (ncp) सोडून ज्यांची सत्ता येईल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असंही या दोन्ही आमदारांनी स्पष्ट केलं आहे.

अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी विधान भवनात पोहोचले आहेत. मी या सभागृहाचा सदस्य आहे. 12 आमदारांना अपात्र ठरवू नका, अशी मागणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत. या विषयाबाबत आम्ही उपसभापतींना पत्रही दिले आहे. सध्या उपसभापतीं येथे नाहीत. त्यांचे प्रतिनिधी असून त्यांना आम्ही पत्र दिले आहे, असं महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

तरीही शिंदेंना पाठिंबा देऊ

काँग्रेस, राष्ट्रवादी सोडून जो कोणी सरकार बनवेल आम्ही त्यांच्यासोबत राहू. सरकार स्थापण्यासाठी आजपर्यंत कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तरीही आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊ, असंही या दोघांनी स्पष्ट केलं.

17 आमदारांच्या निलंबनाची शिफारस

शिवसेनेने काल 12 आणि आज पाच अशा एकूण 17 बंडखोर आमदारांचं निलंबन करण्याची शिवसेने शिफारस केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार असून त्यानंतर उपसभापती निर्णय घेतली असं सांगितलं जात आहे.

या आमदारांचं निलंबनाची शिफारस

1) एकनाथ शिंदे 2) अब्दुल सत्तार 3) संदीपान भुमरे 4) प्रकाश सुर्वे 5) तानाजी सावंत 6) महेश शिंदे 7) अनिल बाबर 8) यामिनी जाधव 9) संजय शिरसाट 10) भरत गोगावले 11) बालाजी किणीकर 12) लता सोनावणे 13) सदा सरवणकर 14) प्रकाश आबिटकर 15) संजय रयमुळकर 16) बालाजी कल्याणकर 17) रमेश बोरनारे

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.