… तर मी स्वतःच खो देईन, उदयनराजेंचा चंद्रकांत पाटलांना इशारा
कोणी मला खो घालायचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये, मी कधीही नकारात्मक विचार करत नाही, लोकांच्या कल्याणासाठी कायम सकारात्मक विचार करतो, असा इशारा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale on BJP) यांनी दिला.
सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale on BJP) यांना दिल्लीत पक्ष प्रवेश हवा आहे, तर त्याप्रमाणे तो होईल, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP chandrakant patil) यांनी केलं. त्याचा उदयनराजेंनी खरपूस समाचार घेतलाय. कोणी मला खो घालायचा प्रयत्न केला, तर मी स्वतःच खो घालेन, त्यामुळे कोणीही त्या विचारात राहू नये, मी कधीही नकारात्मक विचार करत नाही, लोकांच्या कल्याणासाठी कायम सकारात्मक विचार करतो, असा इशारा उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale on BJP) यांनी दिला.
लोकांच्या कल्याणासाठी पक्ष प्रवेशाचा निर्णय घेतलाय. कोणत्या पक्षात जायचं की नाही ते नंतर पाहू. पण गेल्या एवढ्या वर्षापासून मी जेवढ्या योजना आणल्या, त्याला कुणीही साथ दिली नाही. मग अशा लोकांबरोबर कशाला रहायचं, असं म्हणत उदयनराजेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकाही केली.
डॉल्बीला पुन्हा समर्थन
गेल्या वर्षी डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे उदयनराजे चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळीही त्यांनी जाहीरपणे डॉल्बीला समर्थन दिलंय. सरकारने विचार करायला हवा, पोरांचा उत्साह वाढायचा असेल तर डॉल्बी हवाच. डॉल्बीमुळे इमारती पडल्याचं काही जण सांगतात. पण तसं असतं तर मग सर्जिकल स्ट्राईकसाठी विमानांची काय गरज होती, डॉल्बीच वाजवले असते तिथंही, असा टोलाही उदयनराजेंनी लगावला.
VIDEO : उदयनराजे काय म्हणाले?