AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

obc reservation : काळजी करू नका, ओबीसींवर अन्याय होणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

इम्पीरिकल डाटा आडनावाच्या आधारे गोळा केला जात आहे. त्यामुळे ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाचे प्रमाण कमी होईल. परिणामी शिक्षणात ओबीसीच्या लाभार्थ्यांची पात्र संख्या घटेल. राजकीय आरक्षणात घट होईल, अशी नाराजीवजा चिंता शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली.

obc reservation : काळजी करू नका, ओबीसींवर अन्याय होणार नाही; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Image Credit source: tv9
| Updated on: Jun 17, 2022 | 6:26 PM
Share

मुंबई : राज्याती ओबीसींच्या आरक्षणावरून सध्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) घेरण्याचे काम भाजपकडून करण्यात येत आहे. दरम्यान या डाटात त्रुटी असल्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी त्या त्रुटी दुरूस्त केल्या जातील, असे म्हटलं होतं. त्यानंतर पुन्हा नव्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यानंतर आज ‘ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदे’ (OBC VJNT Bahujan Parishad) च्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी जयंतकुमार बांठीया आयोगामार्फत इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या (ओबीसी) इम्पीरिकल डाटा गोळा करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर केल्या जातील. इतर मागासवर्गीयांवर अन्याय होणार नाही. तुम्ही बिल्कूल काळजी करू नका, असे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी ‘ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदे’च्या शिष्टमंडळाला दिले. तर यावेळी परिषदेने मुख्यमंत्र्यांसोबतच अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांना निवेदन दिले.

आडनावाच्या आधारे इतर मागास प्रवर्गाचा (ओबीसी) इम्पीरिकल डाटा गोळा करण्याचे काम जयंतकुमार बांठीया आयोगामार्फत सुरू आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये संताप उसळला आहे. त्या पार्श्वभूमीवर ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परिषदेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. परिषदेचे कार्याध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामध्ये राज्य समन्वयक अरूण खरमाटे, कार्यकारिणी सदस्य संजय विभूते, दत्तात्रय चेचर, प्रकाश राठोड आदी मान्यवरांचा समावेश होता. ‘बारा बलुतेदार महामंडळा’ची स्थापना करावी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये अशा आग्रही मागण्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे केल्या.

ओबीसींवर होऊ घातलेला हा अन्याय रोखा

इम्पीरिकल डाटा आडनावाच्या आधारे गोळा केला जात आहे. त्यामुळे ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाचे प्रमाण कमी होईल. परिणामी शिक्षणात ओबीसीच्या लाभार्थ्यांची पात्र संख्या घटेल. राजकीय आरक्षणात घट होईल, अशी नाराजीवजा चिंता शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली. ओबीसींवर होऊ घातलेला हा अन्याय रोखा, अशी विनंतीही शिष्टमंडळाने यावेळी केली.

त्यावर जयंतकुमार बांठीया आयोगाच्या डाटा गोळा करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर केल्या जातील. योग्य प्रकारे इम्पिरिकल डाटा गोळा करूनच तो अहवाल न्यायालयात सादर केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

पंतप्रधानांना पाच लाख सह्यांचे निवेदन देणार

इम्पीरिकल डाटा गोळा करून तो भविष्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यानंतरही 27 टक्के आरक्षणाचे प्रमाण टिकणार नसल्याची भिती आहे. त्यामुळे केंद्र सरकारने संसदेत विधेयक आणून घटनादुरूस्ती करावी. एकूण आरक्षणाची 50 टक्के मर्यादा वाढवावी, आणि ओबीसींचे 27 आरक्षण टिकवावे अशा मागणीसाठी परिषदेच्या वतीने राज्यभरातून 5 लाख सह्यांचे निवेदन पंतप्रधानांना देण्यात येणार आहे. या मागणीची दखल घेतली नाही, तर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात राज्यभरात तीव्र निदर्शने केली जातील, असे परिषदेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.