पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसचा मराठमोळा शिलेदार, डॉ. अमोल देशमुख प्रभारीपदी
नागपुरातील काँग्रेस नेते डॉ. अमोल देशमुख यांची पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे (Amol Deshmukh Congress West Bengal)
नवी दिल्ली : पाच राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसने प्रभारी नेतृत्वाची निवड केली आहे. पश्चिम बंगालचा गड सर करण्यासाठी काँग्रेसने मराठमोळ्या शिलेदारावर जबाबदारी सोपवली आहे. नागपुरातील काँग्रेस नेते डॉ. अमोल देशमुख यांची पश्चिम बंगालचे काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Dr Amol Deshmukh Congress National Co-Ordinator West Bengal)
डॉ. अमोल देशमुख हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संशोधन विभागाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. नागपुरात त्यांनी काँग्रेससाठी काम केलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री रणजीत देशमुख यांचे ते पुत्र आहेत. रणजीत देशमुख यांनी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या कॅबिनेटमध्ये कृषी मंत्रिपद सांभाळले आहे.
कोण आहेत अमोल देशमुख?
व्यवसायाने डॉक्टर, पॅशनने मानवतावादी, तर निवडीने राजकारणी अशी स्वतःची ओळख त्यांनी ट्विटरवर लिहिली आहे. 43 वर्षीय डॉ. अमोल देशमुख हे हेल्थकेअर एक्स्पर्ट आहेत. डॉ. देशमुखांनी पत्नी सुचेता गुप्ता यांच्या साथीने हर्ड फाऊंडेशनची स्थापना केली आहे.
विधानसभा निवडणुकीचा अनुभव
डॉ. अमोल देशमुख यांनी 2014 मधील विधानसभा निवडणूक लढवली होती. राष्ट्रवादीच्या तिकिटावर नागपुरातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
आशिष देशमुखांचे धाकटे बंधू
अमोल देशमुख यांचे मोठे बंधून डॉ. आशिष देशमुख हे भाजप आमदार होते. नागपुरातील काटोल विधानसभा मतदारसंघातून ते आमदार होते. त्यानंतर भाजपला रामराम ठोकत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. सध्या ते काँग्रेसमध्येच आहेत.
काँग्रेसकडून कोणाला कुठली जबाबदारी?
राज्य – विधानसभा निवडणूक प्रभारी
केरळ – महेशमूर्ती लेणी एस जाधव तामिळनाडू आणि पुद्दुचेरी – डॉ. हर्ष वर्धन श्याम आसाम – आकाश सत्यवाली आणि गौरव कपूर पश्चिम बंगाल – डॉ. अमोल देशमुख
INC COMMUNIQUE
Important Notification regarding appointment of National Co-ordinators, Converner of Inter-state initiatives and State In-charges for AICC research department pic.twitter.com/y0XThzxGro
— INC Sandesh (@INCSandesh) February 2, 2021
संबंधित बातम्या:
काँग्रेस कात टाकणार? सोनिया ‘त्या’ नेत्यांना भेटणार!
पश्चिम बंगालमध्येही भाजपची ‘मेगाभरती’!, ममतांचे अनेक दिग्गज भाजपात दाखल
(Dr Amol Deshmukh Congress National Co-Ordinator West Bengal)