AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापासून राऊतापर्यंत! शिवसेनेसह NCPचे कोण कोणते नेते EDच्या जाळ्यात? वाचा संपूर्ण यादी!

15 दिवसांत शिवसेनेचे कोण कोणते नेते ईडीच्या जाळ्यात अडकले? कुणाकुणावर कारवाई झाली? शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे किती जण कारवाईला सामोरे जात आहेत? कोणत्या पक्षाचे किती नेते, मंत्री, आमदार, खासदार ईडीच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे?

मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापासून राऊतापर्यंत! शिवसेनेसह NCPचे कोण कोणते नेते EDच्या जाळ्यात? वाचा संपूर्ण यादी!
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमिराImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 10:54 PM
Share

मुंबई : ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate)! काम, काळ्या पैशांची अफरातफर अर्थात मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) विरोधात कारवाया करणं. सध्या याच ईडीच्या निशाण्यावर शिवसेनेचे अनेक नेते आलेत. गेल्या 15 दिवसांत शिवसेनेच्या तिघांवर कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणा (Central Investigation Agency) आणि महाविकास आघाडी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस पेटत चाललेला आहे. 15 दिवसांत शिवसेनेचे कोण कोणते नेते ईडीच्या जाळ्यात अडकले? कुणाकुणावर कारवाई झाली? शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीचे किती जण कारवाईला सामोरे जात आहेत? कोणत्या पक्षाचे किती नेते, मंत्री, आमदार, खासदार ईडीच्या कचाट्यात अडकण्याची भीती आहे? कुणाकुणाची नावं या संपूर्ण प्रकरणांमध्ये चर्चेत आहेत आहेत? याचा सखोल आणि विस्तृत आढावा आपण घेऊया.

  1. मागील 15 दिवसांत शिवसेनेच्या तीन बड्या नेत्यांवर ईडीने कारवाई केलीय. त्यात 23 मार्च रोजी मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त करण्यात आली. 25 मार्च रोजी ईडीने आपला मोर्चा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईकांकडे वळवला. तर 5 एप्रिल रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केलीय.
  2. मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकरांवर पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने कारवाई केली. त्यात पाटणकरांचे ठाण्यातील 11 फ्लॅटसह 6 कोटी 45 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केली. आमदार प्रताप सरनाईकांवर NSEL घोटाळा प्रकरणात कारवाई झाली. त्यात सरनाईकांचे ठाण्यातील दोन फ्लॅट ईडीने जप्त केले. हिरानंदानी इस्टेटमधील राहत्या घरासह मीरा रोड येथील 250 मीटरची जमीन मिळून एकूण 11 कोटी 35 लाखांची संपत्ती ईडीने जप्त केलीय. तर मंगळवारी गोरेगावातील पत्राचाळ घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंगवरुन संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा अलिबागमधील किहीम गावातील प्लॉट आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे.
  3. आता संजय राऊतांना अटक होणार असं भाकीत किरीट सोमय्यांनी वर्तवलंय. मोहित कंबोजही तेच म्हणत आहेत. नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये जाताच, कंबोज यांनी सलीम के बाद जावेद भी जायेंगे असं म्हटलं होतं. गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या ईडी कारवायांमध्ये किती जणांचा समावेश आहे, ते ही जाणून घेऊयात.
  4. ईडी आणि आयकरच्या कारवायांमध्ये शिवसेना पहिल्या स्थानी आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी आहे. शिवसनेचे 8 नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. तर राष्ट्रवादीच्या 7 नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा लागलाय. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांवर आयकर विभागाचीही बारिक नजर आहे.
  5. शिवसेनेने कोण कोणते नेते EDच्या निशाण्यावर आहेत? याचं उत्तर जाणून घ्यायचं झाल्यास संजय राऊत, अनिल परब, प्रताप सरनाईक, राहुल कनाल, भावना गवळी, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, आनंद अडसुळांचा समावेश आहे.
  6. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नवाब मलिक, अनिल देशमुख, प्राजक्त तनपुरे, एकनाथ खडसे, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागलाय. तर अजित पवारांचे निकटवर्तीय आयकर विभागाच्या फेऱ्यात अडकले आहेत.

इतर बातम्या : 

Breaking : ‘राज्यात काँग्रेसमध्ये कुठलाच समन्वय नाही’, काँग्रेस आमदारांची दिल्ली दरबारी खंत! थेट सोनियांकडे तक्रार

Raju Shetty : आधी आमदाराला बाहेरचा रस्ता, आता महाविकास आघाडीला रामराम! स्वाभिमानीत नेमकं काय घडतंय?

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.