MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. (ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

MLA Pratap Sarnaik ED Raid Live | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर-कार्यालयावर ईडीचे छापे, सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 12:14 PM

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्या घरासह कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र सुरु केलं. सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक (Vihang Sarnaik) आणि पूर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांच्या घरीही ईडीने कारवाई सुरु केली. (ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.

?LIVE UPDATE? 

[svt-event title=”प्रताप सरनाईकांचे सुपुत्र विहंग सरनाईक चौकशीसाठी ताब्यात” date=”24/11/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”‘ईडी’ने आपली एक शाखा भाजप कार्यालयात उघडली!, सरनाईकांच्या घरावरील छापेमारीवर संजय राऊतांचा टोला” date=”24/11/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”टॉवर, पार्क, कॉम्प्लेक्स ते संस्कृती दहीहंडी, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुपचा पसारा नेमका किती? ” date=”24/11/2020,11:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”आम्ही कोणाच्या बापाला भीत नाही, नोटीसा कसल्या पाठवता, घरी या, संजय राऊतांचं थेट चॅलेंज” date=”24/11/2020,12:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=” भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांची प्रतिक्रिया” date=”24/11/2020,10:48AM” class=”svt-cd-green” ] याप्रकरणी ईडीचे प्रवक्ते अधिक माहिती देतील. काँग्रेसच्या काळात सीबीआय पोपट होता. कायद्याला धाब्यावर बसवून काँग्रेसने काम केलं. भाजपच्या काळात यंत्रणेला स्वातंत्र्य आहे. नियमाप्रमाणे संस्था काम करत आहेत. त्यामुळे काँग्रेसला ही धास्ती वाटणं साहजिक आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिली [/svt-event]

[svt-event title=”ईडीची जय्यत तयारी, सरनाईकांवरील धाडीसाठी पुण्याहून खास फौजफाटा मागवला” date=”24/11/2020,12:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाजपचा डोळा सत्तेकडे – सचिन सावंत ” date=”24/11/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] भाजपचे दाखवण्याचे दात वेगळे आणि खाण्याचे वेगळे आहेत. त्यांचा डोळा सत्तेकडे लागला आहे. हे सगळं  सत्तेसाठी  चाललं आहे. देशात सर्वत्र अशा धाडी टाकल्या, तोच पॅटर्न महाराष्ट्रात आहे, अशी टीका सचिन सावंत यांनी केली  [/svt-event]

[svt-event title=”लोकशाही धोक्यात, सचिन सावंत यांची प्रतिक्रिया ” date=”24/11/2020,10:46AM” class=”svt-cd-green” ] लोकशाही धोक्यात, भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? हीन पातळीचं राजकारण करणारा भाजप पक्ष…विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी असे घाणेरडे डाव भाजप करतंय .. लोकांना चिंतन करण्याची वेळ आहे… ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत…. द्वेष बुद्धीने हे छापे समोर आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली. [/svt-event]

[svt-event title=”सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या आहेत – किरीट सोमय्या ” date=”24/11/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ] सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”सरनाईक कुटुंबियांच्या व्यवसायाशी कागदपत्रांची तपासणी ” date=”24/11/2020,10:45AM” class=”svt-cd-green” ]  सरनाईक कुटुंबियांच्या व्यवसायाशी तसेच इतर व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीकडून तपासण्यात येत आहे. त्याशिवाय गेल्या 4 वर्षात केलेले व्यवहार ईडी तपासणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. [/svt-event]

[svt-event title=”ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपचं समर्थन” date=”24/11/2020,10:44AM” class=”svt-cd-green” ] प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी, मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी कारवाईची माहिती, सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपचं समर्थन [/svt-event]

?शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरासह कार्यालयावर ईडीची छापेमारी

?प्रताप सरनाईक यांच्या घरी अंमलबजावणी संचलनालयाच्या पथकाने सकाळीच धाडसत्र

?सरनाईक यांचे सुपुत्र विहंग सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घरीही ईडीने कारवाई

?मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती

(ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

सोमय्यांकडून कारवाईचं समर्थन

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सरनाईक यांच्या घरावर ईडीने केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. “सरनाईक यांनी जर बेनामी मालमत्ता जमवली असेल. मनी लॉन्ड्रिंग केली असेल किंवा खोटी कमा केली असेल तर कारवाई झालीच पाहिजे. मीही सरनाईक यांच्या बाबतीत अशा गोष्टी ऐकल्या होत्या, असं सोमय्या म्हणाले. मी आमदार आहे म्हणून माझ्यावर कारवाई करू नका, असं म्हणणं योग्य नाही,” असंही त्यांनी सांगितलं.

“शिवसेनेचे काही नेते मग ते मुंबईतील असो की इतर ठिकाणचे महापालिकेच्या कंत्राटदारांकडून हप्ते घेतात, अशा लोकांवर कारवाई करायला नको का?,” असा सवालही त्यांनी केला.

“मुंबईतील माफिया कॉन्ट्रॅक्टरकडून या सर्वांना हप्ते जात असताततर त्याच्यावर कारवाई नको. मुंबईचे महापौर झोपडपट्टी वासियांचे कार्य ढापतात, जर उद्या न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले तर असं म्हणाल की मी शिवसेनेची आहे म्हणून कारवाई भ्रष्टाचारी हे भ्रष्टाचारी असतात. मग तो कोणीही असो,” असेही किरीट सोमय्या म्हणाले.

“जो माफिया कॉन्ट्रॅक्टरचा पैसा घेत असेल, तर ती सूडबुद्धीने नाही. भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी आणि त्याचं स्वागत आहे,” असेही त्यांनी सांगितले.

भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही? सचिन सावंत

“लोकशाही धोक्यात, भाजप नेत्यांना नोटिसा का नाही? हीन पातळीचं राजकारण करणारा भाजप पक्ष…विरोधकांना नेस्तनाबूत करण्यासाठी असे घाणेरडे डाव भाजप करतंय .. लोकांना चिंतन करण्याची वेळ आहे… ज्यांना निवडून दिलंय ते लोकशाहीवर घाला घालत आहेत…. द्वेष बुद्धीने हे छापे समोर आहे,” अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी दिली.

“गेल्या 6 वर्षात एकाही भाजप नेत्यावर रेड का नाही? त्यांना नोटीस का नाही? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट… भाजपवाल्यांकडे करोडोची संपत्ती मग त्याची चौकशी का नाही?” असा सवालही सचिन सावंत यांनी केला.

सरनाईकांवर महिला आयोगाकडून कारवाईचा बडगा

दरम्यान अभिनेत्री कंगना रनौतला धमकी दिल्याप्रकरणी प्रताप सरनाईक यांच्यावर महिला आयोगाने कारवाईचा बडगा उगारला होता. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगना रनौतला धमकी दिली आहे. त्यांना तात्काळ अटक करावी. मी स्वतः या प्रकरणाची दखल घेत आहे. असं ट्वीटमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना टॅग करत केलं होतं. (ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

प्रताप सरनाईक कोण आहेत?

प्रताप सरनाईक हे शिवसेनेकडून सलग तिसऱ्यांदा विधानसभेत आमदारपदी निवडून आले आहेत. ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघातून ते आमदारकी भूषवतात. सरनाईक यांचा जन्म वर्ध्याचा. लहानपणी ते मुंबईला स्थायिक झाले.

प्रताप सरनाईक यांनी राष्ट्रवादीतून राजकीय कारकीर्द सुरु केली. 2008 मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. लगेचच 2009 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट मिळाले आणि ते ठाण्यातून आमदार झाले.

विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांचा परिचय

विहंग हे प्रताप सरनाईक यांचे ज्येष्ठ पुत्र, तर पूर्वेश हे सरनाईक यांचे कनिष्ठ पुत्र. दोघेही युवासेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी सरनाईक भावंडांचे घनिष्ठ संबंध आहेत.

पूर्वेश सरनाईक हे युवासेनेचे सचिव आहेत. युवासेनेच्या मोहिमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी असतात. पूर्वेश यांची पत्नी परिशा सरनाईक या ठाणे महानगरपालिकेत नगरसेविका आहेत. त्या प्रभाग क्रमांक 29 चे प्रतिनिधित्व करतात.

विहंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष म्हणून ते 1989 पासून ठाणे शहरातील अनेक रिअल इस्टेट प्रकल्पांमध्ये सामील आहेत. विहंग शांतिवन, विहंग गार्डन, सृष्टी कॉम्प्लेक्स, विहंग रेसिडेन्सी, विहंग टॉवर, विहंग पार्क, रौनक टॉवर, विहंग आर्केड आणि रौनक आर्केड असे त्यांचे रहिवासी प्रकल्प आहेत.

(ED raids residence Of Shivsena MLA Pratap Sarnaik)

संबंधित बातम्या :

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी भाजपच्या राम कदमांना ‘गोड’ बातमी दिली

महिला आयोगाच्या आडून भाजप माझ्या अटकेचा खेळ रचतंय : आमदार प्रताप सरनाईक

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.