Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Politics : ‘आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नकोय’ उद्धव ठाकरेंचा टोमणा एकनाथ शिंदेंनी स्वत:वर घेतला?

Eknath Shide Video : मत फुटलं कोणतं... त्याचा सुद्धा अंदाज लागलेला आहे कुणी काय काय कलाकाऱ्या केल्या, त्याचाही उलगडा झालेलाय.

Maharashtra Politics : 'आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नकोय' उद्धव ठाकरेंचा टोमणा एकनाथ शिंदेंनी स्वत:वर घेतला?
पाहा, काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 12:13 PM

मुंबई : एकनाथ शिंदेच्या (Eknath Shinde Gujarat) नाराजीचं वृत्त समोर आल्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) केलेल्या वक्तव्याची आठवणही करुन दिली जातेय. शिवसेनेच्या वर्धापनदिनाला उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केलं होतं. शिवसेना आमदारांना (Shiv Sena MLA) ज्या पवईतील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तिथं उद्धव ठाकरे यांनी सूचक विधान केलं होतं. मतांची फोडाफोडी, शिवसेनेची गद्दारी, या सगळ्याचा उद्देशून महत्त्वपूर्ण आणि सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं. या विधानाचे आता अर्थ काढले जात आहेत. आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे यावेळी उद्धव ठाकरेंसोबत शिवसेनेचे दिग्गज नेते त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होते.

नेमकं उद्धव ठाकरे यांनी काय म्हटलं होतं?

शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की,…

गेल्या राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचं एकही मत फुटलेलं नाही. एकही नाही. मत फुटलं कोणतं… त्याचा सुद्धा अंदाज लागलेला आहे कुणी काय काय कलाकाऱ्या केल्या, त्याचाही उलगडा झालेलाय.त्यामुळे उद्या मला फाटाफुटीची शक्यता बिलकुल वाटत नाही. शिवसेनेमध्ये आता गद्दार मनाचा कुणीही राहिलेला नाही. फाटाफुटीचं राजकारण आम्ही बघत आलोय. भोगत आलोय. जेव्हा जेव्हा फाटाफूट झाली, तेव्हा शिवसेना अधिक ताकदीनं उभी राहिली. मला आईचं दूध विकणारा नराधम मला शिवसेनेत नको, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. अनेकांनी मरमर मरुन शिवसेना मोठी केली. शिवसेनेने आपल्याल ओळख निर्माण करुन दिली.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे नाराज…

विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे नाराज झालेत. त्यानंतर ते गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली. शिवसेने आमदारांसोबत एकनाथ शिंदे सूरतला जाऊन नॉट रिचेबल झाले. त्यानंतर आता महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. एकीकडे सरकार वाचवण्यासाठीची कसरत महाविकास आघाडीला करावी लागतेय. तर दुसरीकडे भाजपकडून गुजरातमध्ये ऑपरेशन लोटसला सुरुवात झाल्याचं सांगितलं जातंय. 26 आमदार एकनाथ शिंदेसोबत असल्याचं सांगितलं जातं.

सोमवारी विधान परिषदेचं मतदान करुन आल्यानंतर एकनाथ शिंदे हे लगेचच विधान भवनातून बाहेर पडले होते. मतदानानंतर आणि विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतरही शिवसेनेच्या कोणत्याही ज्येष्ठ नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या नव्हत्या. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. अखेर शिवसेनेतील खदखद आणि महाविकास आघाडीतील बिघाडी चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालंय.

नाराज एकनाथ शिंदेंच्या यांच्याशी निगडीत ब्रेकिंग न्यूज, लाईव्ह अपडेट्स जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.