पक्षांतराचा मुहूर्त टळला, एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची चुप्पी

भाजप नेते एकनाथ खडसे यांचा संभाव्य पक्षांतरचा मुहूर्त टळला असला तरी खडसे पक्षांतर मात्र नक्की करतील, अशी विश्वासनीय सुत्रांची माहिती आहे. मात्र, पक्षांतरावर खडसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चुप्पी साधली आहे. Eknath Khadase and NCP leaders silent on changing of party

पक्षांतराचा मुहूर्त टळला, एकनाथ खडसेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांची चुप्पी
Follow us
| Updated on: Oct 17, 2020 | 12:12 PM

मुंबई: भाजप नेते एकनाथ खडसे यांचा संभाव्य पक्षांतराचा मुहूर्त टळला असला तरी खडसे पक्षांतर नक्की करतील, अशी विश्वासनीय सूत्रांची माहिती आहे. खडसे घटस्थापनेच्या दिवशी पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. ( Eknath Khadase and NCP leaders silent on changing of party)

एकनाथ खडसे यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे नेते मौन बाळगून आहेत. त्याबरोबर एकनाथ खडसे यांनी याबाबत चुप्पी साधली आहे. पत्रकारांनी त्यांना पक्षांतराबद्दल विचारले असता त्यानी नो कमेंटस,असे उत्तर दिले.

खडसे नेहमी आपले मत परखडपणे व्यक्त करतात, राष्ट्रवादी प्रवेशाबाबत  विचारले असता त्यांनी चुप्पी साधल्याने कार्यकर्त्यांसह अनेकजण संभ्रमात आहेत.

राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच

जळगावात शुक्रवारी  खडसेंनी “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.

खडसेंना कृषिमंत्रीपद?

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्री देण्यात येणार असल्याच्या चर्चा असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली होती. सध्या कृषी मंत्रीपद हे शिवसेनेकडे असून, सेनेचे दादा भुसे हे कृषी मंत्री आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खात्यांची अदलाबदल करण्यात येण्याची शक्यता असून, शिवसेनेकडे असलेले कृषी मंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे

एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य

( Eknath Khadase and NCP leaders silent on changing of party)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.