एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स, अचानक प्रकृती खालावली, महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पत्रकार परिषद रद्द 

एकनाथ खडसे यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे. (Eknath khadse Cancelled Press Conference Over health issue Ed summons to khadse)

एकनाथ खडसेंना ईडीचं समन्स, अचानक प्रकृती खालावली, महाराष्ट्राचं लक्ष लागलेली पत्रकार परिषद रद्द 
एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:07 AM

मुंबई :  पुण्याच्या भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) अडचणीत सापडलेले आहेत. जावयाच्या अटकेनंतर त्यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज त्यांची पत्रकार परिषद होणार होती. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार, अशी चर्चा होती. मात्र त्याअगोदरच त्यांची प्रकृती ढासळली आहे. त्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे, अशी अधिकृत माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे. (Eknath khadse Cancelled Press Conference Over health issue Ed summons to khadse)

जावयाच्या अटकेनंतर काही तासांतच खडसेंना ईडीचं समन्स

भोसरी येथील जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना परवा मध्यरात्री अटक करण्यात आली आहे. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यानंतर खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली. तसंच खडसेंना देखील अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली. जावयाच्या अटकेनंतर काही तास उलटत नाहीत तोपर्यंतच खडसे यांना देखील ईडीने समन्स समजावलं.

खडसेंंची पत्रकार परिषद रद्द

आज सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना समन्सच्या माध्यमातून देण्यात आले. तत्पूर्वी ईडी कार्यालयातल्या हजेरीअगोदर एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काहीतरी मोठा गौप्यस्फोट करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा होती. परंतु त्या अगोदरच प्रकृती अस्वास्थ्यामुळे आज होणारी पत्रकार परिषद खडसेंना रद्द करावी लागलेली आहे.

खडसेंना मंत्रीपद गमवावं लागलं…!

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे यांना फडणवीस सरकारच्या काळात महसूल मंत्री पद गमवावे लागले होते. यानंतर खडसे यांची चौकशी झाली. झोटिंग समितीने त्यांना क्लीन चिट देखील दिली. मात्र पुन्हा एकदा त्यांना चौकशीला सामोरे जावं लागलं. पदाचा दुरुपयोग करत जमिन खरेदी केल्याचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप आहे.

(Eknath khadse Cancelled Press Conference Over health issue Ed summons to khadse)

हे ही वाचा :

ईडीच्या चौकशीआधी एकनाथ खडसे पत्रकार परिषद घेणार, खडसेंच्या मनात नेमकं काय? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष

जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसेंना पुन्हा मोठा झटका, ईडीकडून चौकशीचे समन्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.