Eknath Khadse | रक्षा खडसेंचा निर्णय काय? एकनाथ खडसे म्हणाले….

पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रक्षा खडसे भाजप सोडणार नाहीत. तो त्यांचा निर्णय आहे, असे खडसेंनी स्पष्ट केले. (Eknath Khadse comment on Raksha Khadse )

Eknath Khadse | रक्षा खडसेंचा निर्णय काय? एकनाथ खडसे म्हणाले....
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 7:52 PM

मुक्ताईनगर : “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रक्षा खडसे भाजप सोडणार नाहीत. तो त्यांचा निर्णय आहे, असे खडसेंनी स्पष्ट केले. (Eknath Khadse comment on Raksha Khadse )

एकनाथ खडसेंच्या सून असलेल्या रक्षा खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रतिनिधीत्व करत आहेत. रक्षा खडसे भाजप  सोडणार नाहीत त्या भाजपमध्येच राहतील, खडसे म्हणाले. खडसेंनी यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे  उदाहरण दिले.

एकनाथ खडसेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, 40 वर्ष काम केलं, खेड्यापाड्यात भाजप पोहोचली नव्हती, मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनंगटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम, पक्षाने अनेक मोठी पदं दिली, भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही टीका केली नाही, असे खडसेंनी सांगितले.

छळाला मर्यादा नव्हत्या, पण मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला गेल्याचे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.

भाजप किंवा केंद्रीय नेतृत्वाविषयी तक्रार नाही, देवेंद्रजी यांनी माझ्या चौकशा लावल्या, याचा मनस्ताप प्रचंड, नाईलाजाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागल्याचं फडणवीसांनी सांगितलं, बदनामी झाली तरी चार वर्ष काढली, अशी भावना एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

सबंधित बातम्या :

पक्ष सोडू नये म्हणून चंद्रकांत पाटलांशिवाय कुणाचाही फोन नाही; खडसेंचा गौप्यस्फोट

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

(Eknath Khadse comment on Raksha Khadse )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.