…म्हणून वेदांता राज्याबाहेर गेला; एकनाथ खडसेंचा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा
वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
मुंबई : वेदांता फॉक्सकॉन (Vedanta) प्रकरणावरून सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आला आहे. यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या वादात राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी देखील उडी घेतली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून एकनाथ खडसेंनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यातील उद्योग स्थलांतरीत होता कामा नये, मात्र राज्य सरकारचा दबाव नसल्यानं उद्योगांच स्थालांतर होत असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. उद्योगांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचं देखील खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा वेदातांवरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.
नेमकं काय म्हटलं एकनाथ खडसे यांनी?
वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरून एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर टीका केली आहे. उद्योगांबाबत राज्य सरकारची भूमिका स्पष्ट नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर जात आहेत कारण सरकारचा दबाव नाही अशी टीका खडसे यांनी केली आहे. राज्यातील उद्योग स्थलांतरीत होता कामा नये असं खडसे यांनी म्हटलं आहे.
वेदांतावरून विरोधक, सत्ताधारी आमने-सामने
सध्या वेदांताचा मुद्दा चांगलाच तापला आहे. वेदांता राज्याबाहेर जाण्यास कोण जबाबदार? यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरूनच काही दिवसांपूर्वी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केलं होतं. आदित्य ठाकरेंच्या आंदोलनानंतर भाजपनं देखील याच मुद्द्यावरून आंदोलन केल्याचं पहायला मिळालं. आदित्य ठाकरे यांच्याकडे वेदांताबाबत काही कागदपत्रे असतील तर ते त्यांनी उघड करावेत असं आव्हान देखील भाजपाच्या वतीने देण्यात आलं होतं.