Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

"मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली" असं एकनाथ खडसे म्हणाले.

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 2:44 PM

जळगाव : “मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी छळले, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला” असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after left BJP)

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले.

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकरांसारखे कितीतरी नेते होते, त्यांच्यासोबत आजतागातयत भाजपचं काम केलं.   भाजपने मला अनेक मोठी पदं दिली, मी ती नाकारु शकत नाही. मी भाजपवर किंवा केंद्रातील नेत्यावर टीका केली नाही, असं खडसे म्हणाले.

माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असं सांगितलं आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असं खडसे म्हणाले.

भाजप सोडताना खंत आहे. मला पक्षातून ढकलून लावलं. महिलेला माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला सांगितला, फडणवीसांनी मनस्ताप दिला, असं खडसेंनी सांगितलं.

मला राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलं नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदं मिळवली आहेत. सहकारातून मिळवलं आहे, असं खडसे म्हणाले.

Eknath Khadse LIVE

भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा, 40 वर्ष काम केलं, खेड्यापाड्यात भाजप पोहोचली नव्हती, मुंडे, महाजन, गडकरी, फरांदे, फुंडकर, मुनंगटीवार यांच्यासोबत प्रामाणिक काम, पक्षाने अनेक मोठी पदं दिली, भाजपवर रोष नाही, केंद्रीय नेत्यावर कधीही टीका नाही : एकनाथ खडसे

बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती, एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला, पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला : एकनाथ खडसे

छळाला मर्यादा नव्हत्या, पण मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला : एकनाथ खडसे

भाजप किंवा केंद्रीय नेतृत्वाविषयी तक्रार नाही, देवेंद्रजी यांनी माझ्या चौकशा लावल्या, याचा मनस्ताप प्रचंड, नाईलाजाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागल्याचं फडणवीसांनी सांगितलं, बदनामी झाली तरी चार वर्ष काढली : एकनाथ खडसे

गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर यासारख्या नेत्यासोंबत काम केले. भाजप विषयी रोष नाही, केंद्रीय नेत्यावर टीका केली नाही. बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे म्हणल्यानंतर काय घडले ते महाराष्ट्राला माहित आहे. दमानिया यांनी खोटा गुन्हा दाखल केला. देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा दाखल करायला सांगितला. त्या खटल्यातून बाहेर आलो.

छळाला मर्यादा नव्हत्या, पण मी सहन केले, भ्रष्टाचाराचा आरोप केला, विधानमंडळातील रेकॉर्ड काढावं, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यापैकी एकाही पक्षाने माझ्या चौकशीची मागणी केली नव्हती, तसं झाल्यास मी राजकारण सोडेन, तरीही माझा राजीनामा घेतला : एकनाथ खडसे

बहुजन समाजाचा मुख्यमंत्री असला पाहिजे, या माझ्या वक्तव्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राला माहिती, एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला, पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला : एकनाथ खडसे

भाजप किंवा केंद्रीय नेतृत्वाविषयी तक्रार नाही, देवेंद्रजी यांनी माझ्या चौकशा लावल्या, याचा मनस्ताप प्रचंड, नाईलाजाने विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा लागल्याचं फडणवीसांनी सांगितलं, बदनामी झाली तरी चार वर्ष काढली : एकनाथ खडसे

माझ्या कथित पीएवर नऊ महिने पाळत ठेवल्याचं सभागृहात कबूल केलं, पारदर्शी व्यवहार पाहता, मोठमोठ नेते तर भ्रष्टाचाराचा आरोप असलेले, त्यांच्यावर कारवाई नाही, जनतेकडून मोठा प्रतिसाद : एकनाथ खडसे

23 तारखेला राष्ट्रवादीत प्रवेश करणार : एकनाथ खडसे

देवेंद्रजी मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर झालेला एक आरोप सांगा, नाईलाजाने मला भाजपचा त्याग करावा लागत आहे : एकनाथ खडसे

विनयभंगाचा गुन्हा दाखल केला, ही सर्वात मनस्तापाची, पंधरा दिवसांपूर्वी त्यातून बाहेर आलो, नाहीतर तीन वर्ष तुरुंगात गेलो असतो, आयुष्यभराची बदनामी केली असती : एकनाथ खडसे

देवेंद्रजी मुख्यमंत्री होईपर्यंत माझ्यावर झालेला एक आरोप सांगा, नाईलाजाने मला भाजपचा त्याग करावा लागत आहे : एकनाथ खडसे

मला चंद्रकांतदादा पाटलांशिवाय एकाचाही फोन आलेला नाही, ज्येष्ठ-ज्येष्ठ म्हणत इथे आणून सोडलं : एकनाथ खडसे

माझा ट्विटर पासवर्ड दोघा-तिघांकडे, जयंत पाटलांचं ट्वीट चुकून रिट्वीट झालं : एकनाथ खडसे

मी स्पष्टवक्ता आहे, कोणाचीही भीड ठेवत नाही, हाच माझा गुन्हा, माझ्यासोबत एकही आमदार-खासदार नाही, रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा प्रश्न : एकनाथ खडसे

राष्ट्रवादीने कोणतंही आश्वासन दिलेलं नाही, पद वगैरे ते सांगतील, माझ्यासोबत माझी ताकद आहे : एकनाथ खडसे

भाजपला रामराम

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

Eknath Khadse first reaction after left BJP

संबंधित बातम्या

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले… 

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…!

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.