एकनाथ खडसेंच्या पुढाकाराने राष्ट्रवादीची ‘महाभरती’ जोरात; चाळीसगावमधील भाजप कार्यकर्त्यांनी मनगटावर बांधले घड्याळ
'जिकडे खडसे' तिकडे आम्ही', असा नारा देत भाजपच्या या कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले. | Eknath Khadse
जळगाव: एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पुढाकाराने जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु झालेल्या ‘महाभरती’ला मिळणारा प्रतिसाद उत्तरोत्तर वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी भाजप आमदार यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेरमधील भाजप कार्यकर्त्यांची फौज गळाला लावली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा चाळीसगाव मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होताना दिसले. (BJP workers in Jalgaon join NCP under leadership of Eknath Khadse)
‘जिकडे खडसे’ तिकडे आम्ही’, असा नारा देत भाजपच्या या कार्यकर्त्यांनी मनगटावर घड्याळ बांधले. एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत जवळपास 100 कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यामध्ये भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहकार क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समजते. या कार्यक्रमाला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षा रोहीणी खडसे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील निवृत्ती पाटील हेदेखील उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या जाण्याने आम्हाला फरक पडणार नाही किंवा आमच्याकडे एकनाथ खडसे यांची उणीव भरुन काढणारे सक्षम नेते आहेत, हे भाजप नेत्यांचे दावे केवळ बोलण्यापुरतेच मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा येथील भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहकार क्षेत्रातील पदाधिकारी अशा शंभर जणांनी आज #राष्ट्रवादी_काँग्रेस_पक्षात प्रवेश केला. यावेळी जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर उपस्थित होत्या. @NCPspeaks @Jayant_R_Patil @AjitPawarSpeaks pic.twitter.com/u7Z4BpdEXb
— Eknath Khadse (@EknathGKhadse) November 5, 2020
मात्र, गिरीश महाजन हे अजूनही ही गोष्ट मान्य करायला तयार नाहीत. जामनेरमधील भाजप कार्यकत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लक्ष्य केले होते. जामनेरमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांमध्ये एकही जण भाजपचा सदस्य नव्हता. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनाच राष्ट्रवादीत घेतले, ते भाजपचे कार्यकर्ते असल्याचे भासवले गेल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला होता.
तर एकनाथ खडसे यांनीही जामनेरमधील भाजप कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर भाजपला इशारा दिला होता. आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली होती.
संबंधित बातम्या:
राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, कोल्हापुरातील माजी आमदार ‘घड्याळ’ बांधणार
राष्ट्रवादीचा धमाका, अवघ्या दोन महिन्यात तब्बल पाच माजी आमदारांच्या हाती घड्याळ
आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
(BJP workers in Jalgaon join NCP under leadership of Eknath Khadse)