एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता

भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर विचार विनिमय करणार आहेत. (Eknath Khadse may take Big Decision after Lockdown)

एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता
Follow us
| Updated on: May 10, 2020 | 3:41 PM

जळगाव : विधानसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषदेचंही तिकीट नाकारलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे लॉकडाऊननंतर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांशी चर्चा करुन खडसे पुढील राजकीय वाटचाल ठरवण्याची चिन्हं आहेत. (Eknath Khadse may take Big Decision after Lockdown)

विधानपरिषदेवर जाण्यास उत्सुक असतानाही उमेदवारी डावलल्याने एकनाथ खडसे खवळले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत योग्य व्यक्तींना उमेदवारी न मिळाल्याने एकनाथ खडसे यांची नाराजी उघड झाली होती. एकनाथ खडसे यांना विविध पक्षांकडून पुन्हा ऑफर येत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे पक्षांतर करण्याची शक्यता बळावली आहे.

हेही वाचा : MLC Polls : ‘मोदी गो बॅक’ म्हणणाऱ्यांना उमेदवारी, एकनाथ खडसे खवळले

भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांसह एकनाथ खडसे विचार विनिमय करणार आहेत. आपल्यावर वारंवार अन्याय होत आहे, आपल्याला बाजूला सारले जात आहे, आता तरी आपण निर्णय घ्या, अशी विनंती एकनाथ खडसे यांना कार्यकर्ते फोनवरुन करत आहेत.

‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे एकनाथ खडसे यांनी सध्या शांत राहण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र लॉकडाऊननंतर सर्वांशी विचारविनिमय करुन खडसे निर्णय घेणार असल्याचं म्हटलं जातं. एकनाथ खडसे यांनी विधानसभेला तिकीट नाकारल्याबद्दल मनातील खदखद डिसेंबर महिन्यात गोपीनाथगडावरुन जाहीर बोलून दाखवली होती. मात्र पक्ष सोडण्याच्या अटकळी त्यांनी उडवून लावल्या होत्या. आता पुन्हा उमेदवारी नाकारल्याने खडसे काय निर्णय घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. (Eknath Khadse may take Big Decision after Lockdown)

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उत्सुक नेत्यांना पुन्हा एकदा डावललं आहे. पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या नेत्यांच्या नावावर फुली मारली. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली.

“गोपीचंद पडळकर यांनी काही दिवस आधी मोदींच्या सभेवर बहिष्कार टाकून ‘गो बॅक मोदी’ असा नारा लगावला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर बहिष्कार टाकणाऱ्या नेत्याला विधानपरिषदेवर संधी दिली जाते. पण आम्ही चाळीस वर्षे निष्ठेने काम केले. भारतीय जनता पार्टी कोणत्या दिशेने चालली, यावर चिंतन करण्याची गरज असल्याचं एकनाथ खडसे म्हणाले होते.

(Eknath Khadse may take Big Decision after Lockdown)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.