माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे

भाजप नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात आहे.

माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाचे सारे मुहूर्त तुमचेच : एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 8:36 PM

जळगाव : भाजप नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या राष्ट्रवादी (Nationalist Congress Party) प्रवेशाची जोरदार चर्चा असून ते उद्या घटस्थापनेच्या मुहूर्तावर पक्षांतर करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, आज दुपारी जळगावात असताना खडसेंनी “राष्ट्रवादी प्रवेशाबाबत मला काहीच बोलायचे नाही, नो कमेंट्स” असे उत्तर देत या विषयाचे खंडन केले. “माझ्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच आहेत”, असेही ते यावेळी म्हणाले.

शुक्रवारी दुपारी एकनाथ खडसे हे खासगी कामानिमित्त जळगावात आले होते. आपल्या निवासस्थानी असताना ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना त्यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, “या विषयाबाबत मला कोणतीही चर्चा करायची नाही”. मी राष्ट्रवादीत जाणार म्हणून जे मुहूर्त सांगितले जात आहेत, ते सारे मुहूर्त तुम्हीच म्हणजेच माध्यमांनी ठरवले आहेत, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचे खंडन केले.

खडसेंना कृषिमंत्रीपद

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्री देण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या कृषिमंत्रिपद हे शिवसेनेकडे असून, सेनेचे दादा भुसे हे कृषिमंत्री आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खात्यांची अदलाबदल करण्यात येण्याची शक्यता असून, शिवसेनेकडे असलेले कृषिमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे?

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर राष्ट्रवादीकडून खडसेंची वर्णी लावली जाऊ शकते. त्यानंतर खडसे यांना कृषीमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. सध्या हे खातं शिवसेनेकडे असून दादा भुसे हे कृषीमंत्री आहे. त्याबदल्यात शिवसेनेला राष्ट्रवादीकडील गृहनिर्माण मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आहे.

पाहा काय म्हणाले एकनाथ खडसे

बोरखेड्यातील घटना दुर्दैवी : खडसे

रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे घडलेल्या चार अल्पवयीन भावंडांच्या निर्घृण हत्येसंदर्भात बोलताना खडसे म्हणाले की, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेत 14 वर्ष वयाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे समोर येत आहे. ही बाब अत्यंत घृणास्पद आहे”. तसेच “पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्या”, अशी मागणीदेखील खडसे यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी

जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चोऱ्या, हाणामाऱ्या, खून, महिला व युवतींवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत मी पोलीस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. पण काहीएक उपयोग झालेला नाही. जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली आहे, असा आरोपही खडसेंनी केला.

एकनाथ खडसेंचं नाराजीनाट्य!

पुण्यातील जमीन प्रकरणावरुन एकनाथ खडसे फडणवीस सरकारच्या काळात महसूल खात्याचा राजीनामा दिला. काही काळानंतर खडसेंचं पुनर्वसन केलं जाईल अशी शक्यता होती. पण पुढे खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळालंच नाही. 2019च्या विधानसभा निवडणुकीतही खडसेंना तिकीट नाकारण्यात आलं. त्यांच्याऐवजी मुलगी रोहिणी खडसे यांना संधी देण्यात आली. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पक्षातीलच काही लोकांमुळे मुलीला पराभव पत्करावा लागल्याची खंत खडसेंनी अनेकदा बोलून दाखवली आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून गिरीश महाजनांना मिळणारं बळ आणि आपल्याला मिळणारी वागणूक यामुळं संतापलेल्या खडसेंनी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात आपली खदखद बोलून दाखवली आहे. खडसेंची नाराजी विधान सभेतही लपून राहिलेली नाही.

संबंधित बातम्या

एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य

एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला

‘नाथाभाऊ…लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती

(Eknath Khadse says You are giving dates about My entry into Nationalist congress Party)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.