AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

भाजपच्या पक्षबांधणीसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा, जास्त होती असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे. (Eknath Khadse Jalgaon)

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी
| Updated on: Oct 30, 2020 | 11:22 AM
Share

जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हळूहळू ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण जळगाव भाजपने काल बोलावलेल्या पक्षबांधणीच्या बैठकीपेक्षा, खडसेंना शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी जास्त असल्याचं चित्र पाहायला मिळालं. एकनाथ खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांची रेलचेल होती. ही कार्यकर्त्यांची संख्या भाजपच्या पक्षबांधणीसाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा, जास्त होती असा दावा खडसे समर्थकांकडून करण्यात येत आहे. (Eknath Khadse starts to show his strength at Jalgaon)

जळगावातील मुक्ताईनगर या खडसेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाची पक्षबांधणीसाठी बैठक झाली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशानंतर भाजपाची ही पहिलीच पक्षबांधणीची बैठक होती.

खडसेंच्या पक्षांतरानंतर गिरीश महाजन अ‍ॅक्टिव्ह, रक्षा खडसेंच्या गैरहजेरीवर पहिली कमेंट

जळगाव जिल्ह्यात काही तालुक्यात मुक्ताईनगर भुसावळ, रावेर, या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. मात्र या बैठकांमध्ये स्थानिक तुरळक कार्यकर्त्यांचीच उपस्थिती होती. माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही याठिकाणी पाठ फिरवली होती.

मुक्ताईनगर बैठकीत प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक, संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, खासदार रक्षा खडसे, भाजपा जिल्हाध्यक्ष आ सुरेश भोळे, अशोक कांडेलकर, डॉक्टर राजेंद्र फडके,यांची या बैठकीला उपस्थिती होती.

खडसे गेल्याने भाजपाला फटका बसणार नाही : गिरीश महाजन

“एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने भाजपला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही. याउलट आगामी काळात पक्षसंघटन मजबूत करण्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे” असा दावा भाजप आमदार गिरीश महाजन यांनी केला होता. भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. हा व्यक्ती केंद्रित पक्ष नाही. त्यामुळे पक्षातील कोणी एक जण गेल्याने त्याचा काहीएक परिणाम पक्षाच्या संघटनेवर होत नसतो, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.

राष्ट्रवादीने आमदारकी दिली तरी आनंदच : एकनाथ खडसे

राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्यपालांच्या कोट्यातून आमदारकी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना एकनाथ खडसे यांनी मी कोणत्याही पदाच्या अपेक्षेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला नसून मी आमदारकी किंवा खासदारकी मागितली नाही. पण ती दिली तर आनंदच आहे असं खडसे म्हणाले.

संबंधित बातम्या: 

राष्ट्रवादीकडे आमदारकी-खासदारकी मागितली नाही, दिली तर आनंदच आहे: एकनाथ खडसे

खडसे गेल्याने भाजपाला कोणत्याही प्रकारचा फटका बसणार नाही- गिरीश महाजन  

एकनाथ खडसे, आनंद शिंदे विधान परिषदेवर?; राष्ट्रवादीची सोशल इंजिनीअरिंग सुरू

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.