EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली.

EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 7:59 PM

मुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान, खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वत:चं ट्विटर अकाऊंटही डिलीट केलं.

नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. (Eknath Khadse to enter NCP on Friday announce Jayant Patil)

 एकनाथ खडसे यांनी भाजपचा त्याग केला, शुक्रवारी दुपारी दोन वाजता खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. 

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची माहिती सूत्रांनी दिली होती. त्यावर शिक्कामोर्तब झालं.  एकनाथ खडसे हे उद्या समर्थकांसह मुंबईत दाखल होतील.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

“मी भाजपच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा आज दिला. गेल्या 40 वर्षात मी भाजपचं काम केलं. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवली” असं एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse first reaction after left BJP)

काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, देवेंद्र फडणवीसांनी छळले. मी फक्त फडणवीसांवर नाराज आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आणि तो देवेंद्र फडणवीसांना गुन्हा दाखल करायला लावला याचा मनस्ताप झाला, असं खडसे म्हणाले. सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचं स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल, असेही जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उस्मानाबाद: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनीमा दिल्याचं कळल्यावर यावर बोलेन. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर. आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत तेच याबद्द्ल सांगू शकतील, खडसेंना थांबवणार का यावर फडणवीसांच उत्तर.

चंद्रकांत पाटील यांची पत्रकार परिषद

नाथाभाऊ रागावतील पण ही स्टेप घेतील असं वाटलं नव्हतं, त्यांनी राजीनामा दिला हे कटू सत्य, त्यांनी नेतृत्व करावं ही इच्छा होती, ज्या पक्षात जात आहेत, तिथे चांगलं काम करावं, यासाठी शुभेच्छा : चंद्रकांत पाटील

एकनाथ खडसे हे ज्या पक्षात जात आहेत, तिथे त्यांनी चांगलं काम करावं, त्यांना खूप खूप शुभेच्छा – चंद्रकांत पाटील

ज्यांच्यावर खडसेंनी आरोप केले, त्या फडणवीसांनी दिल्लीत स्पष्टीकरण दिलंय, भंगाळे प्रकरण, दाऊदची बायको किंवा भोसरी जमीन खरेदी, त्यामुळे त्यांच्यावर नेमका काय अन्याय झाला हे माहित नाही : चंद्रकांत पाटील

जयंत पाटलांचं ट्विट खडसेंनी रिट्विट केल्यावर मी संपर्क साधला, त्यानंतर त्यांनी ते काढल्यामुळे मी आशावादी होतो, की दोर तुटला नाही, पण अखेर निर्णय झालाच : चंद्रकांत पाटील

खडसेंचा शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त चुकल्यानंतर आता त्यांनी राजकीय सीमोल्लंघनासाठी नवी वेळ निश्चित केली आहे. त्यानुसार एकनाथ खडसे (Eknath Khadse) येत्या शुक्रवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. खडसे यांच्या गोटात त्यादृष्टीने हालचालाही सुरु झाल्या आहेत. त्यासाठी खडसे समर्थकांना गुरुवारी मुंबईत जमण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

रक्षा खडसे भाजपमध्येच?

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द

1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

संबंधित बातम्या 

Eknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही, फडणवीसांनी छळले : एकनाथ खडसे

Eknath Khadse | पहिल्या निवडणुकीत पराभव ते 30 वर्ष मुक्ताईनगरवर अधिराज्य, एकनाथ खडसेंची कारकीर्द

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’

मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट   

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना? 

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.