खडसेंचं मिशन महाजन? हाडवैरी सुरेशदादांना शुभेच्छा, जळगावकरांच्या भुवया उंचावल्या!

भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे हळूहळू महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) रुळत असल्याचं चित्र आहे.

खडसेंचं मिशन महाजन? हाडवैरी सुरेशदादांना शुभेच्छा, जळगावकरांच्या भुवया उंचावल्या!
Follow us
| Updated on: Nov 23, 2020 | 12:37 PM

जळगाव : भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे हळूहळू महाविकास आघाडीत (Mahavikas Aaghadi) रुळत असल्याचं चित्र आहे. त्याची प्रचिती सोशल मीडियावर येत आहे. एकनाथ खडसे यांनी त्यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक आणि हाडवैरी असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन (Suresh Jain) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. खडसेंनी सुरेशदादांना शुभेच्छा देणं हे जळगावकरांसाठी (Jalgaon Politics) आश्चर्यकारक अशीच घटना आहे. कारण गेली दोन दशकं जळगावकरांनी खडसे विरुद्ध सुरेशदादा जैन असाच सामना पाहिला आहे. (Eknath Khadses birthday wishesh to Suresh Jain)

सुरेशदादा जैन यांचा काल वाढदिवस होता. त्यानिमित्त एकनाथ खडसे यांनी ट्विट केलं. “शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री. सुरेशदादा जैन यांचे वाढदिवसाबद्दल हार्दिक अभीष्टचिंतन!” असं खडसे म्हणाले. खरंतर वाढदिवसाला शुभेच्छा देणं यावरुन कोणते राजकीय अर्थ काढण्यात तथ्य नाही. पण जळगावकरांसाठी ही घडामोड आश्चर्यकारकच होती.

खडसे भाजपमध्ये असताना सुरेश जैन हे त्यांचे कट्टर विरोधक होते. मात्र खडसे राष्ट्रवादी जाताच खडसे यांनी सुरेश जैन यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिल्यांदाच शुभेच्छा दिल्या. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यात आता नवीन समीकरण खडसे तयार करतात की काय अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. खडसे आणि जैन हे राजकारणातील कट्टर विरोधक मानले जातात. मात्र उत्तर महाराष्ट्रात भाजपाला नेस्तनाबूत करण्यासाठी खडसे सर्व शक्ती एकवटत आहेत का असा या निमित्ताने प्रश्न आहे. जळगावात खडसे आणि जैन यांचं वैर जर मैत्रीत बदललं तर भाजपच्या गडाला सुरुंग लावणं खडसेंना मदतीचं ठरणार आहे. विशेषत: देवेंद्र फडणवीसांच्या काळात, भाजपने गिरीश महाजन यांना दिलेली ताकद पाहता, खडसेंचं ‘मिशन महाजन’ सुरु झालंय की काय, असा प्रश्न आहे.

वाचा : एकनाथ खडसेंनी स्वत:च्या मतदारसंघात लक्ष केंद्रित करावं, गिरीश महाजनांचा पहिला वार

काही दिवसापूर्वी खडसे आणि सुरेशदादांचे पुतणे, विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन यांचीही भेट झाली होती. त्यानंतर आता खडसेंनी सुरेशदादांना शुभेच्छा देऊन अप्रत्यक्षरित्या मैत्रीचा हात पुढे केला आहे की काय, अशीही कुजबूज सुरु आहे.

महाजनांच्या बालेकिल्ल्याला खडसेंचा सुरुंग, जामनेरमधील ‘दोन बसभर’ भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत

खडसे-जैन एकत्र येऊन गिरीश महाजन यांच्या राजकारणाला कलाटणी देणार का? भाजपला नेस्तनाबूत करुन, खडसे राष्ट्रवादीला उभारी कशी देणार? जळगावातील राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जाणार हे येत्या काळात पाहायला मिळेल.

(Eknath Khadses birthday wishesh to Suresh Jain)

खडसे-महाजन संघर्ष

फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

“भाजपला ताकद दाखवून देतो”

“आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशानंतर केली होती. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला होता.

संबंधित बातम्या  

Eknath Khadse | जनतेनं मला 6 वेळा निवडणुन दिलं, प्रसाद लाड यांनी एकदा तरी दाखवावं: एकनाथ खडसे 

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.