Eknath Shinde : अखेर एकनाथ शिंदेंनी राज्यपालांची वेळ मागितली, ऑनलाईन शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न? आता राज्यपाल काय करणार?

आता हाऑनलाईन शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न आहे का? असा सवाल विचारला जात आहेत. तसेच एकनाथ शिंदे यांच्या मागणीवर आता राज्यपाल काय करणार? असाही सवाल उपस्थित होत आहे.

Eknath Shinde : अखेर एकनाथ शिंदेंनी राज्यपालांची वेळ मागितली, ऑनलाईन शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न? आता राज्यपाल काय करणार?
एकनाथ शिंदे Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 5:18 PM

मुंबई : राज्याच्या राजकारणात भूकंप झालेला आहे. शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे शिवसेनेकडून (Shivsena) एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना कारवाईचा इशारा देण्यात आलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलंय. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांची वेळ मागितली आहे. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदार सध्या आसामच्या गुवाहाटीमध्ये आहेत. त्यामुळे अशावेळी एकनाथ शिंदे आणि राज्यपालांचा ऑनलाईन संवाद होणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.

एकनाथ शिंदे यांचं नरहरी झिरवळांना पत्र

विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनाही शिंदे यांनी एक पत्र लिहिले आहे. या पत्रावर शिवसेनेच्या एकूण 43 आमदारांच्या स्वाक्षरी आहेत. या पत्रात शिंदे यांनी शिवेसना प्रतोद सुनील प्रभू यांनी आमदारांना जारी केलेला व्हीव बेकायदेशीर असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर शिवसेनेच्या मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचही त्यांनी आपल्या पत्रात सांगितलं आहे.

दोन नियुक्त्या

या पत्रात दोन नियुक्त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. एक म्हणजे एकनाथ शिंदे हेच गटनेते असतील असा ठराव करण्यात आला आहे. त्याला भरत गोगावले आणि आणि महेश शिंदे यांनी अनुमोदन दिलं आहे. तर प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला संजय रायमुलकर यांनी अनुमोदन दिलं आहे. या पत्रात 34 आमदारांच्या सह्या आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.