Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण चिन्हं मिळू शकतं का? घटनातज्ञ उल्हास बापट म्हणतात, हो पण एक अटय !

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर पूर्ण सरकार बरखास्त होईल. आता जे सुरु आहे ते सायकॉलॉजीकल युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्र्यांकडे अजूनही सर्व अधिकार आहेत

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण चिन्हं मिळू शकतं का? घटनातज्ञ उल्हास बापट म्हणतात, हो पण एक अटय !
घटनातज्ज्ञ उल्हास बापट Image Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 2:43 PM

पुणे: सध्या जे महाराष्ट्रात चालू आहे महाराष्ट्रात याला आम्ही सायकॉलॉजिकल (Psychological War) वॉर म्हणतो. काही लोकं बाहेर गेलेत, यातले किती लोकं खरंच गेलेत, किती पाठवले गेलेत याचा आकडा नेमका स्पष्ट नाही. परंतु दोन तृतीयांश लोकं जर का बाहेर पडले तर ते डिसक्वालिफाय होत नाहीत. इथे जो पक्ष आहे तोच खरा शिवसेना पक्ष (Shivsena Party) आहे. आसाम मध्ये जे आमदार गेले आहेत. बंडखोर आमदारांना हा पक्ष आमचा आहे असा दावा करता येत नाही. याने मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर कोणताही परिणाम होत नाही. असं कायदेततज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) म्हणालेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी दोन तृतीयांश बहुमत सिद्ध केलं तर त्यांना शिवसेनेचे चिन्ह मिळू शकतं. मात्र, ही प्रकिया एक दोन तासात पूर्ण होत नाही. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला तर पूर्ण सरकार बरखास्त होईल. आता जे सुरु आहे ते सायकॉलॉजीकल युद्ध सुरु आहे. मुख्यमंत्र्यांकडे अजूनही सर्व अधिकार आहेत असंही ते म्हणालेत. यात निवडणूक आयोगाचे काम हे अंपायरसारखं असल्याचं सुद्धा उल्हास बापट यांनी आवर्जून सांगितलंय.

काय म्हणतायत उल्हास बापट…

हे सुद्धा वाचा

शिवसेनेकडे किती आमदार?

एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड केले होते तेव्हा शिवसेनेकडे 22 आमदार शिल्लक होते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढली असून, आता शिवसेनेकडे केवळ 15 च आमदार आहेत. त्यामध्ये,

  • राजन साळवी (राजापूर)
  • सुनील प्रभू (मालाड)
  • प्रकाश फातर्पेकर (चेंबूर)
  • सुनील राऊत ( विक्रोळी)
  • वैभव नाईक ( कुडाळ-मालवण)
  • आदित्य ठाकरे ( वरळी)
  • रमेश कोरगावकर (भांडुप)
  • कैलास पाटील (पाचोरा)
  • नितीन देशमुख ( बाळापूर)
  • अजय चौधरी (शिवडी)
  • राहुल पाटील (परभणी)
  • संतोष बांगर ( हिंगोली)
  • भास्कर जाधव (गुहागर)
  • रवींद्र वायकर ( जोगेश्वरी)
  • संजय पोतनीस ( कलिना) यांचा समावेश आहे.

शिवसेनेत बंडखोरी सुरूच

दरम्यान काल उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करून सुद्धा शिवसेनेत बंडखोरी सुरूच आहे. आता शिवसेनेकडे केवळ 15 आमदार शिल्लक आहेत. बाकीचे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. सुरुवातीला आपल्याला 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत शिवसेनेला सोडून, एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये वाढच होत आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा देखील समावेश आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.