AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : चंद्रकांत पाटील 4 आमदारांसह सूरतहून गुवाहाटीला रवाना, ठाकरेंना आणखी एक मोठा दणका

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्षांना पक्ष लिहीत थेट शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. त्यानी नव्या मुख् प्रतोदची नियुक्ती केली आहे.

Eknath Shinde : चंद्रकांत पाटील 4 आमदारांसह सूरतहून गुवाहाटीला रवाना, ठाकरेंना आणखी एक मोठा दणका
चंद्रकांत पाटील,भाजपा प्रदेशाध्यक्षImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 22, 2022 | 4:51 PM
Share

मुंबई : भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार आमदारांसह गुवाहटीला रवाना झाले आहेत. भाजपच्या गोटात सध्या सत्ता बदलासाठीच्या हलचाली वाढल्या आहेत. चंद्रकात पाटील गुवाहाटीत जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा अध्यक्षांना पक्ष लिहीत थेट शिवसेना  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे. त्यांनी नव्या मुख्य प्रतोदची नियुक्ती केली आहे. आमदार एकनाथ शिंदे यांनी उपसभापती नरहरी झिरवळ यांना 34 आमदारांच्या (MLA) स्वाक्षऱ्यांचं पत्र पाठवलं आहे. यावरुन शिंदेंसोबत तेवढे आमदार कन्फर्म असल्याचा अर्थ काढला जातोय. यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर पुन्हा मेठा पेच निर्माण झालाय. एकनाथ शिंदे यांनी 34 आमदारांचं पत्र विधानसभा उपाध्यक्षांना पाठवून भरत गोगावले हे आमचे मुख्य प्रतोद असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, हा शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय.  दरम्यान, काल शिवसेनेनं सतरा आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र  विधानसभा उपाध्यक्षांसमोर देऊन अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावर शिंदे गटातील आमदारांनी आक्षेप घेतला होता.

एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान

एकीकडे शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशा दिला आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट उद्धव ठाकरे यांनाच आव्हान देण्यात आलं आहे. कारण, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचं ट्विटद्वारे सांगितलंय. इतकंच नाही तर सुनील प्रभू यांनी काढलेले आजचे आदेश कायदेशीर दृष्ट्या अवैध आहेत, असा दावाही त्यांनी केलाय.

शिवसेना आमदारही म्हणतात भाजपसोबत चला!

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपण शिवसेनेतच आहोत. आमच्या आमदारांनी कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही. तसंच आम्ही पक्ष सोडलेला नाही असं स्पष्ट केलंय. त्याचवेळी आपल्यासोबत तब्बल 46 आमदार असल्याचा दावाही शिंदे यांनी केलाय. 

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.