Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नेत्यांशी संपर्क, चर्चेसाठी तयार, वरिष्ठ नेत्याला सुरतला बोलवलं

एकनाथ शिंदेबाबत थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचा नेमका कोणता नेता एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी रवाना होते, हे कळू शकलेलं नाही.

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नेत्यांशी संपर्क, चर्चेसाठी तयार, वरिष्ठ नेत्याला सुरतला बोलवलं
एकनाथ शिंदे यांचा शिवसेना नेत्यांशी संपर्क, चर्चेसाठी तयार, वरिष्ठ नेत्याला सुरतला बोलवलंImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 21, 2022 | 11:21 AM

मुंबई : कालपासून नॉट रिचेबल असणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी अखेर शिवसेनेकडून (Shivsena) संपर्क झाला असल्याचं खात्रीलायक वृत्त हाती आलंय. शिवसेनेच्या (Cm Uddhav Thackeray) एका वरिष्ठ नेत्याला सूरतला बोलावलं असल्याची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदेची नाराजी दूर करण्यात आता शिवसेनेला यश येतं का, हे पाहणं महत्त्वाचंय. एकनाथ शिंदेबाबत थोड्याच वेळापूर्वी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचा नेमका कोणता नेता एकनाथ शिंदेंसोबत चर्चा करण्यासाठी रवाना होते, हे कळू शकलेलं नाही. एकनाथ शिंदे हे सध्या गुजरातच्या सूरतमधील एका हॉटेलात असून त्यांच्यासोबत काही आमदार असल्याचीही माहिती आहे. एकनाथ शिंदेचं बंड थोपवण्याचं आव्हान सध्या शिवसेनेसमोर उभं ठाकलंय. एकनाथ शिंदेच्या नाराजीनाट्याने महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय.

सर्व आमदारांशी आमचा संपर्क झालाय

याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आज सकाळपासून अनेकांशी संपर्क झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुंबईच्या बाहेर आहेत. त्यांच्याशीही संपर्क झाला आहे. जसे चित्र निर्माण केलं आहे. तसं काही भूंकप वगैरे आहे. नक्कीच काही गोष्टी संशयास्पद आहेत. त्याबाबत वर्षावर सर्वांची बैठक आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून सर्व आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश पॅटर्न प्रमाणे ठाकरे सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे. पण हा पॅटर्न चालणार नाही. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.

आईचं दूध विकणारी औलाद होणार नाही

तर असा महाराष्ट्राच्या छातीवर घाव घालता येणार नाही. शिवसेनेव घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईवर ताबा मिळवण्याची लोढा यांची भाषा , मुंबईवर ताबा म्हणजे नेमकं यांना काय हवंय. असे प्रयत्न त्यांनी आधीही केले आहे. शिवसेनेत आईचं दूध विकणारी औलाद होणार नाही. शिवसेना ही निष्ठावंतांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी स्वताला विकरणाही औलाद महाराष्ट्रात निर्माण होणार नाही. जे बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहतोय. अनेक आमदार आत्ता वर्षावर येत आहेत. अनेक नावं आम्ही पाहतोय. जे आमदार इथे नाहीत ते सांगतात की आम्हाला काय झालंय कळत नाही. हे आमदार गुजरातमध्ये सुरतमध्ये आहेत, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.  त्यामुळे सेनेचे हे प्रयत्न किती यशस्वी ठरतात? हेही चित्र लवकच स्पष्ट होईल.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.