Sanjay Raut : एकनाथ शिंदेंकडे फक्त नावाला मुख्यमंत्रिपद? राऊत म्हणतात, फडणवीसच खरे मुख्यमंत्री
महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर करण्यात आले होते, उस्मानाबादचे धाराशिव असे नामाकरण करण्यात आले होते. अशा पाच निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे सरकार हिंदुत्वद्रोही आहे महाराष्ट्रद्रोही आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाच काही मुद्यांना घेऊन आग्रही होता असे असताना आता घेतलेल्या निर्णयाला स्थगिती का ? असा सवाल खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई : (Maharashtra Politics) राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप हे थांबायचे नाव घेत नाहीत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे अॅक्शन मोडमध्ये असून अनेक वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या आहेत. असे असतानाही याचे श्रेय हे मुख्यमंत्री (Eknath Shinde) एकनाथ शिंदे यांना नाहीच. ते नावाला मुख्यमंत्री असून राज्याचे खरे मुख्यमंत्री हे फडणवीसच असल्याचा घणाघात (Sanjay Raut) खा. संजय राऊत यांनी केला आहे. नागपूर येथे पक्ष संघटनच्या निमित्ताने ते दाखल झाले असता मिडियाशी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला आहे. एकतर हे सरकार कायद्याला धरुन स्थापन झालेले नाही. मंत्रिमंडळाची बैठक म्हणून दोघेच निर्णय घेत असून यामध्ये कुणाची महत्वाची भूमिका असते हे आता सर्वांना कळाले असल्याचे म्हणत खरी सूत्रे ही उपमुख्यमंत्रीच हलवत असल्याचेही राऊतांनी सांगितले.
मुख्यंमंत्र्यावर निशाना
ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकार निर्णय घेत आहे यामध्ये देवेंद्र फडणवीसच हेच आहेत. शिवाय गेल्या काही दिवसांपासून जे निर्णय होत आहेत याबाबत मुख्यमंत्र्यांना नाहीतर उपमुख्यमंत्र्यांनाच अधिकचे विचारणे गरजेचे आहे कारण करता करविता कोण आहे हे आता लपून राहिलेले आहे. शिवाय एक दोन प्रसंगातून ते सर्वांसमोर आल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री हे नामधारी असून वास्तवतेचे चित्र वेगळे असल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री अए
ठाकरे सरकारच्या पाच निर्णयाला स्थगिती
महाविकास आघाडी सरकारच्या काळात औरंगाबादचे संभाजी नगर करण्यात आले होते, उस्मानाबादचे धाराशिव असे नामाकरण करण्यात आले होते. अशा पाच निर्णयाला राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हे सरकार हिंदुत्वद्रोही आहे महाराष्ट्रद्रोही आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाच काही मुद्यांना घेऊन आग्रही होता असे असताना आता घेतलेल्या निर्णयाला स्थगिती का ? असा सवाल खा. संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. लोकभावनेचा आदर म्हणून महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतले होते. त्याला स्थगिती यापेक्षा दुर्देव ते काय असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
‘औरंगजेब, उस्मान कोण लागतो तुमचा?’
या निर्णयांना स्थगिती देऊन शिंदे सरकारने नेमकं काय साध्य केलं, असा सवाल विचारल्यावर राऊत म्हणाले, ‘काय साध्य केलंय हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना विचारा. मुख्यमंत्र्यांच्या हातात नाही. एकिकडे हिंदुत्व सोडलं म्हणून आक्रोश करतायत आणि दुसरीकडे हिंदुत्वासाठी जे निर्णय घेतले, त्यांना स्थगिती कशासाठी देतायत? राजकीय निर्णय समजू शकतो. आर्थिक विषयही समजू शकतो.असे म्हणूनही निर्णयामागचे नेमके कारण काय हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.