Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्ली वारी! शाह आणि नड्डांच्या भेटीची शक्यता, विस्ताराबाबत काय निर्णय होणार?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं नवी दिल्लीत दाखल झालेत. एका खासगी विमानानं ते दिल्लीत दाखल झालेत. आजच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाली.

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे आजारी, फडणवीसांची दिल्ली वारी! शाह आणि नड्डांच्या भेटीची शक्यता, विस्ताराबाबत काय निर्णय होणार?
फडणवीसांची दिल्ली वारी!
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 5:48 PM

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आजारी असल्याचं वृत्त दुपारी समोर आलं. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) शिंदे गटातील आमदारांच्या याचिकेवर सुनावणी झाली. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढं ढकलली आहे. त्यानंतर तासाभरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईवरून दिल्लीसाठी रवाना झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर फडणवीस दिल्लीत विमानतळावर (Delhi Airport) दाखल झालेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत (Cabinet Extension) फडणवीसांची ही दिल्ली वारी आहे का, अशा चर्चांना यामुळं उधाण आलंय. देवेंद्र फडणवीस यांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत. फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या नेत्यांना भेटण्याची शक्यता आहे. शिवाय विस्ताराबाबत काही निर्णय होणार का, याकडं सर्वांच लक्ष लागलंय.

खासगी विमानानं दिल्लीत दाखल

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीनं नवी दिल्लीत दाखल झालेत. एका खासगी विमानानं ते दिल्लीत दाखल झालेत. आजच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी झाली. व्हीआयपी टर्मिनलनं ते दाखल झालेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची गाडी विमानतळातून बाहेर निघाली. राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार पूर्णपणे रखडला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांची बैठक होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नाही

आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याचं वृत्त समोर आलं. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला. त्यामुळं देवेंद्र फडणवीस एकटेच दिल्लीला गेले असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. त्यावर ते दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी बोलण्याची शक्यता आहे. शिवाय सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेवरील याचिकेवरील सुनावणी पुढं ढकलली आहे. त्यामुळं पुढची रणनीती काय असेल, यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांच्या घरी दिल्लीत बैठक

एकनाथ शिंदे गटावर टीका करताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, शिंदे गट ही शिवसेना नाही तर भाजपा आहे. यापैकी एक जड भाजप तर एक हलकी भाजप आहे. शिवसेना मात्र एकचं असल्याची टीका त्यांनी केली. दुसरीकडं देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदी हजेरी लावत आहेत. मार्गारेट अल्वा या यूपीएच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.