मुंबई लोकलच्या टीव्हीवर शिंदे गटाचा दसरा मेळावा कुणाच्या आशीर्वादाने दाखवला गेला? उत्तर मिळालं!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचं चक्क मुंबई लोकलमध्ये थेट प्रक्षेपण कुणी केलं?
काम्या भट्टाचार्या, TV9 मराठी, मुंबई : पश्चिम रेल्वेत (Western railway) जाहीरातीसाठीच्या टीव्हीवर शिंदेंच्या मेळाव्याचं प्रक्षेपण झाल्याचं समोर आलंय. याची गंभीर दखल पश्चिम रेल्वे प्रशासनानेही घेतलीय. कंत्राटदाराने कराराचा भंग करून भाषण लावल्याचं रेल्वेच्या निदर्शनास आलंय. त्यामुळे आता कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत रेल्वेच्या वतीने देण्यात आलेत. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे (Uddhav Thackeray vs Ekanth Shinde) असा दसरा मेळाव्याचा (Dussehra Melava) संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला होता.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बीकेसीत झालेल्या दसरा मेळाव्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी गंभीर आरोप देखील केले होते. दारुच्या बाटल्या, नको त्या गोष्टींची सोय, यावरुन सनसनाटी आरोप पेडणेकर यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावर केले होते. या सगळ्यांची चर्चा रंगलेली असतानाच आता लोकलमध्ये बेकायदेशीरपणे कुणी एकनाथ शिंदे यांचं भाषण लाईव्ह टेलिकास्ट केलं, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.
पाहा लाईव्ह घडामोडी : Video
बुधवारी शिंदे विरुद्ध ठाकरे असा दसरा मेळाव्याचा राजकीय संघर्ष मुंबईत पाहायला मिळाला होता. त्यासाठी शिंदे गटाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आलं होतं. अशातच दसरा मेळाव्याचं एकनाथ शिंदे यांचं भाषण अचानक मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलमधील टीव्हीवर लाईव्ह दिसू लागलं. लोकलच्या जाहिरातीसाठींच्या टीव्हीवर राजकीय भाषण लाईव्ह कसं काय दिसू लागलं, यावरुन अनेक प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
Mumbai local trains live telecast Maharashtra Chief Minister #EknathShinde political rally, WR stops it promptly says no permission was ever given, will seek explaination from LED TV contractor. #EknathShinde #MaharashtraPolitics
Read here: pic.twitter.com/VJo3x1LaRY
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) October 6, 2022
तब्बल 10 ते 15 मिनिटं हे लाईव्ह प्रक्षेपण सुर होतं, अशी चर्चा मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल प्रवाशांमध्ये रंगलीय. विशेष म्हणजे जेव्हा ही बाब रेल्वे प्रशानाच्या ध्यानात आली, तेव्हा त्यांनीह हे प्रक्षेपण तातडीने थांबवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली.
काही प्रवाशांनी या प्रकाराचे ट्वीट करत पश्चिम रेल्वेला टॅग केलं आणि हा प्रकार योग्य आहे का, असा प्रश्न केला. त्यावरुन पश्चिम रेल्वेनंही घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतलीय. कोणत्याही प्रकारची परवानही न घेता राजकीय भाषणं लोकलमध्ये दाखवणं गैर असून याप्रकरणी कंत्राटदाराकडून खुलासा मागवण्यात आला. तसंच याप्रकरणी आता दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेच्या वतीने सांगण्यात आलंय.