Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: कोण आहेत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई ज्यांच्या हातात आता महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेची सूत्रं असतील? काय आहेत पर्याय?

Eknath Shinde News : गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई कोण आहेत? नेमके काय पर्याय आता असणार आहेत, याची चर्चा रंगू लागली आहे.

Eknath Shinde: कोण आहेत गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई ज्यांच्या हातात आता महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेची सूत्रं असतील? काय आहेत पर्याय?
एकनाथ शिंदे गोव्याला जाणार?Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 10:23 AM

मुंबई : महाराष्ट्राच्या (Maharashtra Politics) सत्ता स्थापनेची सूत्र आता गोव्यातून (Goa News) हलतील, असं म्हटलं जातंय. गोव्याच्या राज्यपालांकडे महाराष्ट्राचा कारभार दिला जाऊ शकतो, अशी शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor) यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे, असी शक्यता वर्तवली जातेय. या पार्श्वभूमीवर गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई कोण आहेत? नेमके काय पर्याय आता असणार आहेत, याची चर्चा रंगू लागली आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोण आहेत, गोव्याचे राज्यपाल पिल्लई?

गोव्याच्या राज्यपालांचा अल्पपरिचय

  1. श्रीधरन पिल्लई यांचं नाव पी.एस श्रीधरन पिल्लई असं आहे.
  2. गोव्याचे राज्यपाल होण्याआधी ते मिझोरमचे राज्यपाल होते.
  3. 6 जुलै 2021 रोजी त्यांची गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती.
  4. पिल्लई एक भारतीय राजकारणी, वकील असून ते लेखकही आहेत. त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत.
  5. हे सुद्धा वाचा
  6. ते केरळ राज्याचे भाजपचे अध्यक्षबी होते.
  7. पिल्लई यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिर भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मार्फत केली होती.
  8. कॉलेजात असताना ते एबीव्हिपीचे राज्य सचिव होते.
  9. 2003 ते 2006 मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती.
  10. 2004 मध्ये त्यांनी लक्षद्वीप यूटीचे भाजप प्रभारी म्हणूनही काम केलंय.
  11. त्यांच्या नेतृत्त्वाखाली 2004 मध्ये नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सने केरळ आणि लक्षद्वीप या दोन खासदारीच्या जागा जिंकल्या होत्या.

एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडे चाळीसपेक्षा जास्त आमदार असल्याचं सांगितलं. त्यामुळे बहुमतासाठी लागणारा 37 पेक्षा जास्त जास्त आमदारांची संख्या ही एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे, असं स्पष्ट झालंय. दरम्यान, आज एकनाथ शिंदे हे गोव्याच्या दिशेने रवाना होती, असं सांगितलं जातंय. त्यामुळे सूरतमध्ये बंड करुन आसाममध्ये पोहोचलेले एकनाथ शिंदे, दगाफटका होऊ नये म्हणून थेट गोव्याला जाण्याची शक्यता आहे.

कसं आहे सत्तेचं गणित?

सत्तेचं गणित समजून घ्या...

सत्तेचं गणित समजून घ्या…

पाहा एकनाथ शिंदे यांचा EXCLUSIVE फोनो :

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडाचे LIVE अपडेट्स, इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लु हॉटेलमध्ये राहण्याची सोय

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.