Eknath Shinde | मोठी बातमी | हॉटेल रेडिसन ब्लूमधून बाहेर पडलेल्या गाडीतून नेमकं कोण गेलं? एकनाथ शिंदे नाहीत मग कोण?

गुवाहटीतून एकनाथ शिंदे निघाले. बंडखोर आमदारांची बैठक संपली, पुढची रणनीती काय?

Eknath Shinde | मोठी बातमी | हॉटेल रेडिसन ब्लूमधून बाहेर पडलेल्या गाडीतून नेमकं कोण गेलं? एकनाथ शिंदे नाहीत मग कोण?
एकनाथ शिंदे गुवाहटीच्या हॉटेलमधून निघाले
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 1:27 PM

मुंबईः गेल्या तीन दिवसांपासून गुवाहटीत ठाण मांडून बसलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुवाहटीतून बाहेर पडल्याची माहिती काही मिनिटांपूर्वी पुढे आली. एकनाथ शिंदे गुवाहटीतील ज्या हॉटेल रेडिसन ब्लू येथे मुक्कामी आहेत, तेथून एक इनोव्हा कार बाहेर आली. या गाडीतून नेमकं कोण हॉटेलच्या बाहेर गेलं, याची माहिती अद्याप समोर आली नाही.  शिंदे आणि त्यांच्या गटातील बंडखोर आमदार (Shiv Sena MLA) येथे वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील राजकीय (Maharashtra politics) घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आसाममधील गुवाहटीत मोठ्या घडामोडी घडत आहेत.  हॉटेल रेडिसन ब्लू येथील परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हॉटेलमध्ये जाण्यास कुणालाही परवानगी नाही. त्यामुळे प्रवेशद्वारातून आत जाणारे आणि तेथून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवरून अंदाज काढला जातोय. हॉटेलमधून नुकतीच एक इनोव्हा कार बाहेर आली. त्यात एकनाथ शिंदे असल्याची चर्चा आधी झाली. मात्र एकनाथ शिंदे गटाकडून ही माहिती फेटाळली गेली. एकनाथ शिंदे हॉटेलमध्येच असल्याची माहिती आमदारांनी दिली.

इनोव्हा गाडीतून कोण गेलं?

मागील तीन दिवसांपासून एकनाथ शिंदे गटात फक्त आमदारांचं इनकमिंग सुरु आहे. गुवाहटीतून दुसरीकडे एकही आमदार गेला नाही. किंवा शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे सरकारकडे निरोप घेऊनदेखील कुणीही गेलं नाही. मग नुकतीच हॉटेलमधून बाहेर पडलेल्या कारमधून नेमकं कोण गेलं? याबद्दल आता चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे ही कार एअरपोर्टच्या दिशेने गेली.

‘लवकर गुवाहटी सोडा’

दरम्यान, आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष भुपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लवकरात लवकर गुवाहटी सोडा, असा इशारा दिला आहे. संवैधानिक मूल्ये आणि निष्ठा यांचा अजिबात आदर नसलेल्या आमदारांसाठी गुवाहटी हे योग्य नाही. तुमच्या उपस्थितीमुळे आसामची बदनामी झाली आहे. आसामच्या भल्यासाठी लवकरात लवकर आसाम सोडावे, असा इशारा बोराह यांनी पत्राद्वारे दिला आहे.

गुवाहटीत महत्त्वाची बैठक

दरम्यान, गुवाहटीतील हॉटेल रेडिसन ब्लू येथे एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. शिवसेनेनं बंडखोर आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस कायदेशीर रित्या अवैध असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. असा नोटीशींना आम्ही घाबरणार नाहीत, असाही इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात आणि पक्षावर दावा करण्यासंदर्भात पुढील रणनीती काय आखायची यासंदर्भात आमदारांच्या या बैठकीत चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.