Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं नरहरी झिरवळांना पत्र, शिवसेनेने जारी केलेला व्हीप हा बेकायदेशीर

शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी जारी केलेले व्हीप हे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच शिवसेना मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं नरहरी झिरवळांना पत्र, शिवसेनेने जारी केलेला व्हीप हा बेकायदेशीर
एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 4:15 PM

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याविरोधात चांगलेच एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी आता थेट विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळांना (Narhari Zirval) पत्र लिहिले आहे. आणि शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी जारी केलेले व्हीप हे बेकायदेशीर असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. तसेच शिवसेना मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे नेत्यांचा बैठकांचा सपाटा सुरू आहे. भाजपची आता सत्ता बदलासाठी धवपळ सुरू आहेत. राजकीय पंडितही वेगवेगळे अंदाज बाधत आहेत. मात्र एकवेळ समुद्राच्या खोलीचा अंदाज येईल पण राजकारणात पुढे काय घडेल हे घडल्याशिवाय लक्षात येत नाही, अशीच परिस्थिती सध्या राज्यातली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य काय? हे कळायला आणखी काहीशी वाट तर नक्कीच पाहवी लागमार आहे.

एकनाथ शिंदे यांचं ट्विट

भाजप नेत्यांकडून ठाकरेंची खिल्ली

दुसरीकडे भाजप नेत्यांच्या कल्पनांना आता चांगलाच बहार आला आहे. नितेश राणे आणि निलेश राणे या राणे बंधुंनी तर ट्विट पे ट्विट सुरू केले आहेत. ठाकरेंची खिल्ली उडवण्याची एकही संधी सध्या ते सोडत नाहीत.

नवं सरकार येणार आहे

संजय राऊत यांना संविधान आणि त्यातील तरतुदी कळण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. निवडणुका होणार, असे घाबरवून आमदारांना धमक्या काय देताय? सरकार वाचविण्यासाठी चिंता नको, महाराष्ट्रात नवे सरकार येणार, विकास पर्व पुन्हा नव्याने सुरू होणार !, असे ट्विट करत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.

आमदार नितेश राणेंचं ट्विट

मातेश्री 11 बनवा

शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन IPL team साठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा.

निलेश राणे यांचं ट्विट

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.