Eknath Shinde: एकनाथ शिंदे भाजपात प्रवेश करणार की वेगळा पक्ष काढणार? दुपारी बारा वाजता पत्रकार परिषद, देशाचं लक्ष…
दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याते ते त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदें काय भूमिका घेणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय.
मुंबई : एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागलंय. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये जाणार की स्वत:चा वेगळा पक्ष काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याते ते त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
दुपारी पत्रकार परिषद
दुपारी 12 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याते ते त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदें काय भूमिका घेणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय.
भूमिका काय घेणार
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा आहे. ते नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. ते भाजपमध्ये जाणार की स्वत:चा वेगळा पक्ष काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
समर्थक आमदारही सोबत
शिवसेनेचे काही आमदार त्यांच्यासोबत असल्याची माहिती मिळाली आहे. कालच्या शिवसेनेच्या बैठकीला अनेक आमदार गैरहजर असल्याची माहिती समजली होती. तेचं आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शहाजी बापू पाटील, महेश शिंदे सातारा, भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेश थोरवे, विश्वनाथ भोईर, संजय राठोड, संदीपान भुमरे, उदयसिंह राजपूत, संजय शिरसाठ, रमेश बोरणारे, प्रदीप जैस्वाल, अब्दुल सत्तार इत्यादी आमदार सोबत असल्याची माहिती मिळाली आहे.
एकनाथ शिंदेंची फेसबुक पोस्ट
एकनाथ शिंदे सध्या नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर त्यांनी पहिली फेसबुक पोस्ट लिहिली आहे. “योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृध्द जीवनाचा राजमार्ग…”, अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.