Eknath Shinde: शिवसेना नेमकी कुणाची? एकनाथ शिंदे म्हणतात, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचं दैवत, उद्धव ठाकरेचं नावही घेतलं नाही?

Political Crisis MVA Crisis Updates : आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यामुळे आता शिवसेनेचंही धाबं दणाणलं आहे.

Eknath Shinde: शिवसेना नेमकी कुणाची? एकनाथ शिंदे म्हणतात, बाळासाहेब, दिघेसाहेब आमचं दैवत, उद्धव ठाकरेचं नावही घेतलं नाही?
महत्त्वपूर्ण घडामोडी...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:37 AM

मुंबई : बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेसाहेब (Aanand Dighe) हे आमचं दैवत आहेत, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे. बंडखोर आमदारांना घेऊन आसाममध्ये (Shiv sena MLA in Asaam) पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. फोनवरुन त्यांनी थेट आसाममधून टीव्ही 9 मराठीसोबत राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, यावेळी त्यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरुन नाराजीही व्यक्त केली. मी कोणताही निर्णय घेतलेला नसताना, शिस्त मोडलेली नसतात, पक्षविरोधी काम केलेलं नसतात, चर्चा सुरु होती आणि तरिही मला गटनेते पदावरुन काढण्यात आलं, हे बरोबर नाही, असं त्यांनी म्हटलंय. आपल्या आणि आपल्यासोबत असलेल्या आमदारांच्या खदखदीबाबत आपण उद्धवसाहेबांना वेळोवेळी सांगितलं होतं, असंही ते म्हणाले.

शिवसेना नेमकी कुणाची?

शिवसेना नेमकी कुणाची यावरुन आता वाद पेटलाय. एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत असलेल्या आमदारांबाबत स्पष्ट मत नोंदवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्त्वाचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला सत्तेची लाचारी नको, असंही त्यांनी खडसावलंय. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्हाला राहायचं नाही, असंही थेट एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय. मात्र यावेळी त्यांनी शिवसेना सोडणार नाही! काल, आज आणि उद्याही आपण कट्टर शिवसैनिक म्हणूनच काम करत राहणार आहोत, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा

आपल्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केलाय. त्यामुळे आता शिवसेनेचंही धाबं दणाणलं आहे. आसाममध्ये पोहोचल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या आमदाराचं संख्याबळ नेमकं किती आहे, हे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं होतं. तर टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना आपल्या 40+ आमदार माझ्यासोबत आहे, असंही शिंदे म्हणाले आहेत.

सत्तेचं गणित काय

एक ट्वीट 2 बाईट एकनाथ शिंदेच्या बंडखोरीने वातावरण टाईट! सत्तेचं गणित शिंदेंना खरंच जमलंय? समजून घ्या आकडेवारीतून

असं आहे संख्या गणित

वाचा एकनाथ शिंदेच्या बंडखोरीमुळे ढवळून निघालेल्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लाईव्ह अपडेट्स : इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : ‘उद्धवसाहेबांना कधीच धोका देणार नाही’, आणखी एका आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

2019मध्ये शिवसेनेचे कोणकोणते आमदार कुठून निवडून आले होते? वाचा

एकूण 56शिवसेना आमदार मतदारसंघ
1एकनाथ शिंदेकोपरी-पाचपाखाडी
2गुलाबराव पाटीलजळगाव ग्रामीण
3चिमणराव पाटीलएरंडोल
4किशोर पाटीलपाचोरा
5संजय गायकवाड बुलडाणा
6संजय रायमुलकरमेहेकर
7नितीनकुमार तळेबाळापूर
8संजय राठोडदिग्रस
9बालाजी कल्याणकरनांदेड उत्तर
10संतोष बांगरकळमनुरी
11राहुल पाटीलपरभणी
12अब्दुल सत्तारसिल्लोड
13प्रदीप जैसवाल औरंगाबाद मध्य
14संजय शिरसाठऔरंगाबाद पश्चिम
15संदीपान भुमरेपैठण
16रमेश बोरनारे वैजापूर
17सुहास कांदेनांदगाव
18दादा भुसेमालेगाव बाह्य
19श्रीनिवास वनगापालघर
20शांताराम मोरेभिवंडी ग्रामीण
21विश्वनाथ भोईरकल्याण पश्चिम
22बालाजी किणीकरअंबरनाथ
23लताबाई सोनावणेचोपडा
24प्रकाश सुर्वेमागाठणे
25प्रताप सरनाईकमाजीवडा
26सुनील राऊतविक्रोळ
27रमेश कोरगांवकरभांडुप पश्चिम
28रविंद्र वायकरजोगेश्वरी पूर्व
29सुनील प्रभूदिंडोशी
30दिवंगत रमेश लटकेअंधेरी पूर्व
31दिलीप लांडेचांदिवली
32प्रकाश फातर्पेकरचेंबुर
33मंगेश कुडाळकरकुर्ला
34संजय पोतनीसकलिना
35सदा सरवणकरमाहिम
36आदित्य ठाकरेवरळी
37अजय चौधरीशिवडी
38यामिनी जाधवभायखळा
39महेंद्र थोरवेकर्जत
40महेंद्र दळवीअलिबाग
41भरत गोगावलेमहाड
42ज्ञानराज चौगुलेउमरगा
43कैलास पाटीलउस्मानाबाद
44तानाजी सावंतपरांडा
45शाहजी बापू पाटीलसांगोला
46शंभूराजे देसाईपाटण
47योगेश कदमदापोली
48भास्कर जाधवगुहागर
49उदय सामंतरत्नागिरी
50राजन साळवीराजापूर
51वैभव नाईककुडाळ
52दीपक केसरकरसावंतवाडी
53प्रकाश आबीटकरराधानगरी
54अनिल बाबरखानापूर
55सुजित मिंचेकरहातकणंगले
56उद्धव ठाकरेविधान परिषद आमदार
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.