Maharashtra Government LIVE : गटनेतेपदावरुन काढल्याचा एकनाथ शिंदेंना राग आला? एकनाथ शिंदे थेट बोलले आणि स्पष्टच बोलले!
Eknath Shinde News Live Maharashtra Government, Political Crisis MVA Crisis Updates : आमदारांच्या मनात अडीच वर्ष हा रोष होता. त्यात अनेक कंगोरे असतील.
मुंबई : टीव्ही 9 मराठीशी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गटनेते पदाबाबत महत्त्वाचं विधान केलंय. मला गटनेते पदावरुन काढणं बरोबर नाही, असं म्हणत त्यांनी शिवसेनेनं उचलेल्या पावलावरुन नाराजी व्यक्त केली. मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना चर्चेसाठी भेटायला पाठवता आणि मधल्यामध्ये तुम्ही मला गटनेते पदावरुन काढता, हे बरोबर नाही असं एकनाश शिंदे यांनी म्हटलंय. टीव्ही 9 मराठीशी फोनवरुन संपर्क साधला असला त्यांनी ही एक्स्क्लुझिव्ह प्रतिक्रिया दिलीय. उद्धव ठाकरेंसोबत प्रस्तावावर किंवा तत्सम कोणतीही चर्चा झालेली नाही. मिलिंद नार्वेकर यांना सांगितलं की चर्चेला येत असताना मी पक्षविरोधी काम केलेलं नाही, कोणताही निर्णय घेतलेला नाही, तरिही मला गटनेते पदावरुन काढलं. हे बरोबर नाही. तुम्ही बोलणी करायला माणसं पाठवता आणि माझ्यावर कारवाई करता, हे मी उद्धवसाहेबांनाही सांगितलं होतं. आमदारांच्या मनातील खदखद आधीही उद्धवसाहेबांना सांगितलं होती, असंही ते म्हणालेत.
गटनेते पद अवैध ठरणार?
गटनेते पदाची आताची निवड ही अवैध ठरु शकते. संख्याबळ आमच्याकडे आहे. आमदारांच्या मनात अडीच वर्ष हा रोष होता. त्यात अनेक कंगोरे असतील. जेव्हा आमदारांना वाटतं की आता निर्णय घ्यायला हवा, तेव्हा निर्णय घेतला जातो. दरम्यान, 40 हून अधिक आमदार आमच्याकडे आहे, असंही त्यांनी म्हटलंय. अधिक सविस्तर माहिती मला देणार नाही. हा एका रणनितीचा भाग आहे, असंही त्यांनी म्हटलंय.
सत्तेचं गणित :
सोमवारपासून नॉट रिचेबल असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी पहिल्यांचा आपली भूमिका स्पष्ट करणारं ट्वीट केलं होतं. त्यानंतर त्यांनी रात्री उशिरा सूरतहीन आसामला निघताना आणि पुन्हा आसामला पोहोचल्यावर, अशा एकूण दोन वेळा प्रतिक्रिया दिल्या होत्या
.
एकनाथ शिंदे यांचं बंड थोपवण्याचं आव्हान सध्या शिवसेनेसमोर आले. त्यांच्याकडे 40 पेक्षा जास्त आमदार सोबत आहेत, अशी माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे. त्यामुळे आता बहुमतासाठी लागणारी संख्या एकनाथ शिंदे गटाकडे असल्याचंही स्पष्ट झालं. यावरुन आता खरी शिवसेना आणि खोटी शिवसेना असा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यताय.
2019 मध्ये निवडून आलेले शिवसेनेच्या संपूर्ण आमदारांची यादी
एकूण 56 | शिवसेना आमदार | मतदारसंघ |
---|---|---|
1 | एकनाथ शिंदे | कोपरी-पाचपाखाडी |
2 | गुलाबराव पाटील | जळगाव ग्रामीण |
3 | चिमणराव पाटील | एरंडोल |
4 | किशोर पाटील | पाचोरा |
5 | संजय गायकवाड | बुलडाणा |
6 | संजय रायमुलकर | मेहेकर |
7 | नितीनकुमार तळे | बाळापूर |
8 | संजय राठोड | दिग्रस |
9 | बालाजी कल्याणकर | नांदेड उत्तर |
10 | संतोष बांगर | कळमनुरी |
11 | राहुल पाटील | परभणी |
12 | अब्दुल सत्तार | सिल्लोड |
13 | प्रदीप जैसवाल | औरंगाबाद मध्य |
14 | संजय शिरसाठ | औरंगाबाद पश्चिम |
15 | संदीपान भुमरे | पैठण |
16 | रमेश बोरनारे | वैजापूर |
17 | सुहास कांदे | नांदगाव |
18 | दादा भुसे | मालेगाव बाह्य |
19 | श्रीनिवास वनगा | पालघर |
20 | शांताराम मोरे | भिवंडी ग्रामीण |
21 | विश्वनाथ भोईर | कल्याण पश्चिम |
22 | बालाजी किणीकर | अंबरनाथ |
23 | लताबाई सोनावणे | चोपडा |
24 | प्रकाश सुर्वे | मागाठणे |
25 | प्रताप सरनाईक | माजीवडा |
26 | सुनील राऊत | विक्रोळ |
27 | रमेश कोरगांवकर | भांडुप पश्चिम |
28 | रविंद्र वायकर | जोगेश्वरी पूर्व |
29 | सुनील प्रभू | दिंडोशी |
30 | दिवंगत रमेश लटके | अंधेरी पूर्व |
31 | दिलीप लांडे | चांदिवली |
32 | प्रकाश फातर्पेकर | चेंबुर |
33 | मंगेश कुडाळकर | कुर्ला |
34 | संजय पोतनीस | कलिना |
35 | सदा सरवणकर | माहिम |
36 | आदित्य ठाकरे | वरळी |
37 | अजय चौधरी | शिवडी |
38 | यामिनी जाधव | भायखळा |
39 | महेंद्र थोरवे | कर्जत |
40 | महेंद्र दळवी | अलिबाग |
41 | भरत गोगावले | महाड |
42 | ज्ञानराज चौगुले | उमरगा |
43 | कैलास पाटील | उस्मानाबाद |
44 | तानाजी सावंत | परांडा |
45 | शाहजी बापू पाटील | सांगोला |
46 | शंभूराजे देसाई | पाटण |
47 | योगेश कदम | दापोली |
48 | भास्कर जाधव | गुहागर |
49 | उदय सामंत | रत्नागिरी |
50 | राजन साळवी | राजापूर |
51 | वैभव नाईक | कुडाळ |
52 | दीपक केसरकर | सावंतवाडी |
53 | प्रकाश आबीटकर | राधानगरी |
54 | अनिल बाबर | खानापूर |
55 | सुजित मिंचेकर | हातकणंगले |
56 | उद्धव ठाकरे | विधान परिषद आमदार |
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची प्रत्येक बित्तंबातमी लाईव्ह वाचण्यासाठी इथे क्लिक करा : Eknath Shinde News, Maharashtra Government LIVE : कुणालाही मारलेलं नाही- एकनाथ शिंदे